Kalyan Crime Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Crime: ठेकेदाराकडे मागितली २ लाखाची खंडणी; ठेकेदार व कामगारांनाही केली होती मारहाण, आरोपी कोळशेवाडी पोलिसांच्या ताब्यात

Kalyan News : खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून हे काम सुरु असून बिटकॉन इन्फ्रास्टक्चरला काम मिळाले आहे. हे काम संस्थेने कृषी कस्ट्रक्सनचे विजय भोसले आणि सुरेश काळे यांना दिले आहे

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख
कल्याण
: सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडे एका इसमाने दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याची (Kalyan) घटना कल्याण पूर्व परिसरात घडली होती. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसानी (Police) खंडणी मागणाऱ्या सुभाष भोसले याला अटक केली आहे. कल्याण न्यायालयासमोर त्याला हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे. (Tajya Batmya)

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातील नाना पावशे चौक ते नुतन शाळेच्या दरम्यान ५५० मीटर रस्त्याचे सिमेंट काँक्रीटकरणाचे काम सुरु आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून हे काम सुरु असून बिटकॉन इन्फ्रास्टक्चरला काम मिळाले आहे. हे काम संस्थेने कृषी कस्ट्रक्सनचे विजय भोसले आणि सुरेश काळे यांना दिले आहे. राजेश आढांगळे हा त्याठिकाणी मुकादम आहे. एका व्यक्तीने कामाच्या ठिकाणी वारंवार येऊन मजूर आणि मुकादम यांना मारहाण केली. त्याने त्यांच्याकडून २ लाख रुपयांची मागणी केली. सुहास भोसले असे या पैसे मागणाऱ्याचे नाव आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान नोव्हेंबर महिन्यात येऊन त्याने आधी एका मजूराला (Crime News) मारहाण केली. त्यानंतर ११ डिसेंबरला संध्याकाळी येऊन मुकादम राजेश आढांगळेला मारहाण करुन तू तुझ्या मालकाला सांगितले की नाही पैसे देण्यास. पैसे दिले नसल्याने हे काम बंद कर असे धमकाविले. या प्रकरणात राजेश आढांगळे याने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनंतर वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजेश शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखील तपास सुरु करण्यात आला. पोलिसांनी आरोपी सुहास भोसले याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अहिल्यानगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात गायब झालेली ५ वर्षीय मुलगी १६ तासानंतर मृतावस्थेत सापडली

PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांना मिळणार ₹४०००; पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट

Gold Rate Today : सोन्याच्या भावात अचानक मोठी वाढ, प्रति तोळ्याला 'इतकी' किंमत; चांदी ३ दिवसात १५००० हजारांनी वाढली

Black Raisin Benefits: हिवाळ्यात फक्त आठवडाभर खा भिजवलेले काळे मनुके, शरीरात दिसतील जबरदस्त बदल

केवळ १५ दिवसांत भाजपची सोडली साथ; ठाकरेंच्या शिवसेनेत घरवापसी, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT