Railway crime Saam tv
महाराष्ट्र

Railway crime : प्रवासादरम्यान एक्सप्रेसमध्ये चोरी; चोरट्याला ताब्यात घेत पाच लाखांचे मोबाईलसह दागिने हस्तगत

Kalyan News : लांबपल्ल्यांच्या मेल एक्सप्रेस गाड्यांमध्ये रात्रीच्या वेळेस प्रवासी झोपेत असताना किंवा प्रवाशांची नजर चुकवून प्रवाशांच्या बॅगा चोरी होण्याच्या घटना वाढल्या होत्या

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: रेल्वे प्रवासादरम्यान मेल एक्सप्रेस गाड्यांमधून प्रवाशांची नजर चुकवून हातचलाखीने प्रवाशांच्या महागड्या वस्तू चोरणाऱ्या चोरट्याला कल्याण रेल्वे क्राईम ब्रँच पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरलेले जवळपास पाच लाखांचे मोबाईल, आयपॅड, दागिने आणि इतर वस्तू हस्तगत करण्यात आले आहे. सहिमत शेख असे या चोरट्याचे नाव असून तो नवी मुंबईचा राहणार आहे. 

रेल्वे प्रवासात क्राईमच्या घटना घडतच असतात. गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या वस्तू लांबविल्या जातात. त्यानुसार लांबपल्ल्यांच्या मेल एक्सप्रेस गाड्यांमध्ये रात्रीच्या वेळेस प्रवासी झोपेत असताना किंवा प्रवाशांची नजर चुकवून प्रवाशांच्या बॅगा चोरी होण्याच्या घटना वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर कल्याण रेल्वे पोलिसांनी या चोरांचा शोध सुरू केला. साध्या वेशात मेल एक्सप्रेस गाड्यामध्ये तसेच स्टेशन परिसरात गस्ती वाढवल्या होत्या. 

बदलापूर येथून चोरटा ताब्यात 

त्यानुसार निजामुद्दीन मेल एक्सप्रेसमध्ये एका महिलेची पर्स चोरीला गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी कल्याण रेल्वे गुन्हे शाखेचे पोलीस तपास करत असताना हा सराईत चोरटा बदलापूर येथे लपून बसला असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बदलापूर येथे सापळा रचत सहिमत शेख या सराईत चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. 

सहा गुन्हे उघडकीस 

दरम्यान पोलीस तपासात या चोरट्याने केलेले सहा गुन्हे उघड झाले असून त्याच्याकडून महागडे मोबाईल, आयपॅड, दागिने असा सुमारे पाच लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर सहीमतने आणखी काही चोऱ्या केल्याचा संशय पोलिसांना असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT