KDMC News Saam tv
महाराष्ट्र

KDMC News : श्वानप्रेमी महिलेचा केडीएमसीत ठिय्या; जखमी श्वानांवर पालिका उपचार करत नसल्याचा आरोप

Kalyan News : आजार झाल्यास त्यांच्यावर उपचार केले जात नाहीत. तसेच जखमी श्वानांवर उपचार करण्यासाठी देखील महापालिकेकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप या महिलेने केला आहे

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याण- डोंबिवली महापालिका जखमी भटक्या श्वानांवर उपचार करत नाही. निर्बिजीकरण दरम्यान त्यांच्यावर उपचार करत नाही; असे आरोप करत एका श्वानप्रेमी महिलेने जखमी श्वानाला घेऊन महापालिकेत चांगलाच गोंधळ घातला. हिर राजपूत असे या श्वान प्रेमी महिलेचे नाव असून राजपूत यांचे समजूत काढताना केडीएमसी कर्मचारी अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच दमछाक झाल्याचे पाहायला मिळालं.

मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढत असतो. या अनुषंगाने महापालिकेकडून कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात येत असते. ठिकठिकाणी कुत्र्यांना पकडून त्यांना लस दिली जाते. दरम्यान कुत्र्यांना काही आजार किंवा जखमी झाल्यास त्यांच्यावर महापालिका कोणत्याही प्रकार उपचार करत नसल्याने एक श्वानप्रेमी महिला आक्रमक झाली. थेट जखमी श्वानाला घेऊन केडीएमसीच्या आवारात पोहचून गोंधळ घातला. 

कल्याण-  डोंबिवली महानगर पालिका मुख्यालयात पीपल्स ऑफ ॲनिमल्स प्राणी मित्र संघटनेच्या महिला पदाधिकारी हिर राजपूत यांनी आज चांगलाच गोंधळ घातला. रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट श्वानांची निर्बिजीकरण महापालिकेकडून केले जाते. मात्र या दरम्यान काही आजार झाल्यास त्यांच्यावर उपचार केले जात नाहीत. तसेच जखमी श्वानांवर उपचार करण्यासाठी देखील महापालिकेकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप या महिलेने केला आहे. 

मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या 

एखाद्या जखमी श्वानाबाबत माहिती दिल्यास महापालिकेच्या संबंधित विभागाकडून उडवा उडवीचे उत्तरे दिली जात असल्याचा आरोप राजपूत यांनी केला. यामुळे राजपूत या आज जखमी श्वानाला घेऊन महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठाण मांडून बसल्या होत्या. राजपूत यांचा रुद्रावतार पाहून पालिका अधिकाऱ्या कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळालं. अधिकाऱ्यांनी या महिलेचे समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने तब्बल दीड ते दोन तास आपलं ठिय्या आंदोलन सुरूच ठेवलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील पोलीस उपनिरीक्षक विजय सागंडे वय ५७ यांचं निधन

मुंबईच्या ५ स्टार हॉटेलमध्ये जेवायला गेले अन् ताटात काय दिसलं? प्रसिद्ध डॉक्टरांचा थेट तुकाराम मुंढेंकडे संताप

Shocking: स्नानासाठी तलावात डुबकी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ६ मुलांचा बुडून मृत्यू

Accident : मोठी बातमी: मुंबईत भाजप आमदाराच्या कारचा भीषण अपघात, फ्री वे वर ३ वाहनांना धडक

मोठी बातमी! मिरजमध्ये सरकारी रुग्णालयाचा स्लॅब कोसळला; 6 जण ढिगाऱ्याखाली अडकले, 2 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT