Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News: हल्ला करत लांबविले मंगळसूत्र; चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Kalyan News : वार करत लांबविले मंगळसूत्र; चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Rajesh Sonwane

अभिजीत देशमुख
कल्याण
: रस्त्याने पायी चालणाऱ्या महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला करत तिचे मंगळसूत्र हिसकावून चोरटा (Kalyan) पसार झाला होता. या चोरट्याला खडकपाडा पोलिसांनी अवघ्या काही तासात बेड्या ठोकल्या. अश्विन सदाफुले असे पोलिसांनी (Police) ताब्यात घेतलेल्या चोरट्याचे नाव आहे. (Maharashtra News)

कल्याणजवळ असलेल्या मोहने परिसरात प्रीया सावंत ही महिला कुटुंबासह राहते. दरम्यान मंगळवारी दुपारच्या सुमारास प्रिया आपल्या मुलीला शाळेतुन घेण्यासाठी मोहने कॉलनी परिसरातून जात होती. याच दरम्यान एक दुचाकीस्वार (Crime News) तिच्या समोर आला. त्याने प्रीया यांचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रीयाने प्रतिकार करताच या तरुणाने तिच्यावर धारदार शस्त्राने वार करत मंगळसूत्र हिसकावून तेथून पळ काढला. या हल्ल्यात प्रीया जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

काम सुटल्याने झाला बेरोजगार 

याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीसानी पसार झालेल्या आरोपीचा शोध सुरू केला. अवघ्या काही तासात आरोपी अश्विन सदाफुलें याला बेड्या ठोकल्या. अश्विन हा मोहने परिसरात राहतो. काही महिन्यांपूर्वी तो सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. मात्र काम सुटल्याने बेरोजगार झाल्याने आर्थिक चणचनीतुन त्याने चोरीचा मार्ग पत्करला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Corporation Election: जागा वाटपावरून महायुतीचं बिनसलं, शिवसेना युतीमधून बाहेर पडणार? शिंदे गटाचा अल्टिमेटम

शिंदेंच्या यशानं, पवारांना टेन्शन! सेना - राष्ट्रवादीत ईर्ष्येची लढाई, अस्वस्थ दादा का भडकले मंत्र्यांवर?

मशालीला कॉग्रेसचा हात? ठाकरेसेनेला कॉंग्रेसचा पाठिंबा

मुंबईनंतर पुण्यातही काँग्रेस एकटी, पुण्यात दादांमुळे मविआत बिघाडी

Maharashtra Live News Update: पुणे पोलिसांची देशी दारू विक्रीच्या ठिकाणी छापेमारी

SCROLL FOR NEXT