Kalyan News BJP Shivsena Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News: शिवसेना शिंदे गट- भाजप समर्थकांमध्ये राडा; नगरसेवकाच्या समर्थकांकडून भाजप कार्यकर्त्यांना मारहाण

शिवसेना शिंदे गट- भाजप समर्थकांमध्ये राडा; नगरसेवकाच्या समर्थकांकडून भाजप कार्यकर्त्यांना मारहाण

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याणमध्ये भाजप व शिवसेना शिंदे गटात कुरबुरी सुरू असल्याचे आज पुन्हा एकदा समोर आलं. कल्याण पूर्व चक्की नाका परिसरात (BJP) भाजपचे चिन्ह भिंतीवर रंगवत असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना शिंदे गटाच्या नगरसेवकाच्या समर्थकांनी विरोध करत बेदम मारहाण केली. या घटनेनंतर भाजपने देखील आक्रमक पवित्रा घेतला. भाजपचे कल्याण पूर्व शहर अध्यक्ष संजय मोरे यांनी आपल्या (Kalyan) नगरसेवकांना आवरा अन्यथा आम्ही हात सोडू असा इशारा शिवसेना शिंदे गटाला दिला. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंवणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Live Marathi News)

राज्यात शिवसेना शिंदे गट व भाजपच्या नेत्यांकडून युतीत अलबेल असल्याचे सांगत असले तरी कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गट व भाजपामध्ये कुरबुरी सुरूच असल्याचे दिसून येत आहे. कल्याण चक्की नाका टेकडी परिसरात भाजप कार्यकर्त्यांकडून भिंतींवर भाजपच्या पक्ष चिन्हाचे चित्र रंगवण्याचे काम सुरू होते. याच दरम्यान शिंदे गटाचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांचे समर्थक त्या ठिकाणी आले. त्यांनी भाजप (Shinde Group) कार्यकर्त्यांना विरोध करत तीन ते चार कार्यकर्त्यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. 

शिवसेना (Shiv Sena) नगरसेवक मल्लेश शेट्टी यांच्या सांगण्यावरूनच भाजप कार्यकर्त्याना मारहाण झाल्याचा आरोप भाजप शहराध्यक्ष संजय मोरे यांनी केला आहे. यावेळी भाजप कल्याण शहराध्यक्ष संजय मोरे यांनी तुमच्या नगरसेवकांना आवरा अन्यथा आम्ही हात सोडू असा इशारा शिवसेना शिंदे गटाला दिला. भाजप शहर अध्यक्षसह कार्यकर्ते कोळशेवाडी पोलीस ठाण्यात दाखल झालेत. घडल्या प्रकाराबाबत कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Recipe : वजन कमी करण्यासाठी डाएटवर आहात, मग 'ही' हाय प्रोटीन रेसिपी एकदा ट्राय कराच

Mumbai News: दहिसर-भाईंदर लिंक रोडच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना, क्रेन कोसळून २ कामगारांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: जळगाव शहरातील MIDC परिसरातील चटई कंपनीला भीषण आग

परीक्षेला जाताना रस्त्यात अडवलं अन्...; गावगुंडांकडून तरुणीची छेड, संगमनेरमधील धक्कादायक घटना

Health Care: उन्हाळ्यात खजूर खावे की नाही? काय होतात शरीराल फायदे?

SCROLL FOR NEXT