Shahada News: शाळेची इमारत धोकादायक; पालकांनी शाळेला लावले कुलूप

Nandurbar News शाळेची इमारत धोकेदायक; पालकांनी शाळेला लावले कुलूप
Shahada News
Shahada NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे

नंदूरबार : शहादा तालुक्यातील कवळीथ येथे आदर्श हायस्कूलची इमारत धोकेदायक अवस्थेत असून या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या हजार विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत आहे. संस्था चालकांना वारंवार (Nandurbar) सांगितल्यानंतरही इमारतीच्या संदर्भात ठोस भूमिका घेतली जात नसल्याने पालक आणि गावकऱ्यांनी (School) शाळेच्या इमारतीला टाळे ठोकले आहे. जोपर्यंत प्रशासन आणि संस्थाचालक लेखी आश्वासन देत नाही; तोपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय पालक आणि गावकऱ्यांनी घेतला आहे. पालकांनी शाळेच्या इमारतीला कुलूप ठोकल्याने ग्रामीण भागातील शिक्षण संस्थांच्या इमारतीच्या प्रश्न पुन्हा समोर आला आहे. (Breaking Marathi News)

Shahada News
Student Death Case: आश्रम शाळेतील विद्यार्थी मृत्यू प्रकरण..जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई; आदिवासी विकास मंत्री गावित यांचे आदेश

एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. तर दुसरीकडे आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेच्या इमारतीचे दुरावस्था झाल्याने शाळेला कुलूप लावावा लागत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कवळीथ येथे श्री संत नामदेव महाराज एज्युकेशन ट्रस्ट तळोदा संचलित आदर्श हायस्कूल शाळा असून थे पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग आहेत. हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र शाळा ज्या इमारतीत भरते ती इमारत धोकादायक स्थितीत असून काही वर्ग खोल्यांची भिंत पडल्याने पालक आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

Shahada News
Dharashiv News: कुलगुरूच्या मनमानी कामकाजाचा निषेध; शिक्षणप्रेमी नागरीकांचे धरणे आंदोलन

संस्था चालकांना दिले आहे निवेदन 

संस्था चालकांना वारंवार निवेदन (Shahada) देऊनही यासंदर्भात नवीन इमारतीचे नियोजन होत नसल्याने गावकऱ्यांनी शाळेच्या इमारतीला कुलूप लावले. जोपर्यंत संस्था चालक आणि शिक्षण विभाग लेखी आश्वासन देत नाही; तोपर्यंत शाळा सुरू न होऊ देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. शाळेच्या इमारती संदर्भात विद्यार्थ्यांनीही नवीन इमारत उभे करून देण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे पालकांनीही या संदर्भात धोरणात्मक निर्णय संस्थाकांनी घ्यावी अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com