Student Death Case: आश्रम शाळेतील विद्यार्थी मृत्यू प्रकरण..जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई; आदिवासी विकास मंत्री गावित यांचे आदेश

Nandurbar News आश्रम शाळेतील विद्यार्थी मृत्यू प्रकरण..जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई; आदिवासी विकास मंत्री गावित यांचे आदेश
Vijaykumar Gavit
Vijaykumar GavitSaam tv
Published On

सागर निकवाडे

नंदूरबार : धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथे आदिवासी आश्रम शाळेतील इयत्ता पहिली शिकणाऱ्या (Student) विद्यार्थ्यांच्या दुर्दैव मृत्यू झाला होता. या विद्यार्थ्यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन (Vijaykumar Gavit) आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले आहेत. (LIve Marathi News)

Vijaykumar Gavit
Vande Bharat Express: वंदे भारत एक्सप्रेसला मासिक पासची सुविधा करा; रेल्वे प्रवासी संघाकडून मागणी

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथे आदिवासी आश्रम शाळेतील इयत्ता पहिली शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुर्दैव मृत्यू झाला होता, मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे नातेवाईकांनी मृतदेह घेण्यात नकार दिला होता. मात्र दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मुलाच्या मृत्यू ताब्यात घेतला होता. त्यानंतर अंतिमसंस्कार करण्यात आले आहे. त्यामुळे आता राज्याच्या आदिवासी विकास तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी या प्रकरणाची दखल घेत संपूर्ण चौकशी करणार असल्याचे आदेश देण्यात आलेले असून, या घटनेत जो कोणी दोष असेल त्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. 

Vijaykumar Gavit
Vande Bharat Express : 'या' मार्गावर तिसरी वंदे भारत एक्सप्रेस सुरु करा; महाराष्ट्रातील आमदाराची मागणी

उपाययोजनाही हव्या 

मुलाची गेल्या काही (Ashram School) दिवसांपासून तब्येत खराब होती. मात्र आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यासाठी आता दोषींवर कारवाई तर होणारच आहे. मात्र या अशा गोष्टी टाळण्यासाठी आदिवासी विकास विभागाने कठोर अशा उपायोजना तयार करण्याचे देखील मागणी करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com