Kalyan News  Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : कल्याण पूर्वेतील प्रस्तावित घनकचरा प्रकल्पाला विरोध; रस्त्यावर उतरत नागरिकांची घोषणाबाजी

Kalyan : प्रकल्प मानवी वस्त्यांच्या जवळ असल्यामुळे त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना होणार आहे. आरोग्य आणि पर्यावरणावर परिणाम होऊ शकतो. यामुळे येथील स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याण पूर्वेतील १०० फुट रोड परिसरात महानगरपालिकेच्या घनकचरा प्रकल्प प्रस्तावित आहे. या घनकचरा प्रकल्पाविरोधात स्थानिक रहिवाशांचा विरोध असून तीव्र आंदोलन सुरू केले आहे. हा कचरा प्रकल्प मानवी वस्त्यांपासून दूर हलवावा; अशी मागणी करत शेकडो रहिवासी रस्त्यावर उतरत स्वाक्षरी मोहीम आणि घोषणाबाजी करत आंदोलन केले.

कल्याण पूर्वेतील १०० फुट रोड परिसरात महानगरपालिका घनकचरा प्रकल्प प्रस्तावित आहे. तथापि, स्थानिक रहिवाशांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला आहे. सदरचा प्रकल्प मानवी वस्त्यांच्या जवळ असल्यामुळे त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना होणार आहे. प्रामुख्याने आरोग्य आणि पर्यावरणावर याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे येथील स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. 

वस्त्यांपासून दूर हलविण्याची मागणी 

कचरा प्रकल्पाचा विरोध दर्शवत नागरिकांनी स्थानिक आमदार सुलभा गायकवाड यांची भेट घेत प्रश्न मांडला. यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली पालिका अधिकाऱ्यासोबत बैठक झाली. यावेळी रहिवाश्यांनी या प्रकल्पामुळे शेकडो कुटुंबांना नाहक त्रास होणार असल्याने हा प्रकल्प मानवी वस्त्यांपासून दूर हलवण्याची मागणी केली.   

स्वाक्षरी मोहीम राबवत दर्शविला विरोध 

सदरचा प्रकल्प उभारणीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेकडो रहिवाशांनी एकत्र येऊन स्वाक्षरी मोहीम राबवली आणि घोषणाबाजी केली. तसेच जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी रहिवाशांनी केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT