Kalyan-Dombivli Water Supply to Remain Shut saam
महाराष्ट्र

कल्याण डोंबिवलीकरांवर पाणी कपातीचे संकट! 'या' दिवशी १२ तास पाणी येणार नाही, कारण काय?

Kalyan-Dombivli Water Supply to Remain Shut: कल्याण - डोंबिवलीत ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद.

Bhagyashree Kamble

  • कल्याण-डोंबिवलीत पाणीबाणी

  • ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद.

  • दुरूस्तीच्या कामांना सहकार्य करण्याचे आवाहन

संघर्ष गांगुर्डे, साम टिव्ही

कल्याण डोंबिवलीकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. जलवाहिन्यांच्या देखभालीची कामे हाती घेण्यात आल्यामुळे एक दिवसासाठी पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे. मंगळवार, दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. अशी माहिती महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात विद्युत आणि यांत्रिकी दुरूस्तीची तसेच जलवाहिन्यांच्या देखभालीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांसाठी मंगळवार, दिनांक. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलीय.

या पाणी पुरवठा बंदचा फटका कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीण विभाग, मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड आणि अटाळी परिसरातील नागरिकांना बसणार आहे. मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातून या भागात पाणीपुरवठा केला जात असल्यानं या कालावधीत संपूर्ण पुरवठा बंद राहणार आहे.

दरम्यान, या महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना आधीच पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आणि दुरूस्तीच्या कामांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

ZP Elections : मिनी विधानसभेचं बिगुल वाजणार, दोन की एकाच एकाच टप्प्यात निवडणूक? वाचा लेटेस्ट अपडेट

Maharashtra Politics: अजितदादांचा पुणेकरांसाठी मोठा वादा, देवेंद्र फडणीस म्हणाले - 'घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातं'

Kite Making Ideas: मुलांच्या प्रोजेक्टसाठी पतंग बनवायचाय? या टीप्स फॉलो करा, ५ मिनिटांत झटपट होईल तयार

HSC Board Exam : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आजपासून मिळणार ऑनलाईन हॉल तिकीट; कसं कराल डाउनलोड ? वाचा

SCROLL FOR NEXT