Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan : कल्याण डोंबिवलीत वाहतूक कोंडीचा विळखा; नो-एंट्री आदेशानंतरही रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Kalyan News : बेशिस्त वाहन चालकांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी अधिकच वाढली. वाहन चालकांकडून संताप व्यक्त होत आहे. नागरिकांचा स्पष्ट सवाल आहे की वाहतूक पोलिसांनी नियोजन करावं, अन्यथा ही कोंडी आणखी गंभीर होऊ शकते

Rajesh Sonwane

संघर्ष गांगुर्डे 
कल्याण
: कल्याण- डोंबिवली शहर वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडले आहे. नवरात्री उत्सवामुळे वाढलेली गर्दी, त्यात मेट्रोचं सुरू असलेलं काम आणि शहाड उड्डाणपुलाचे काम या सर्वांचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी सहा चाकी, अवजड वाहनं आणि खाजगी बसेसना शहरात नो-एंट्री लागू केली आहे. पण हे आदेश फक्त कागदावरच राहिले आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात संध्याकाळच्या वेळी प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. चाकरमान्यांची घरी जाण्याची लगबग असल्याने वाहनांची अधिक गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीवर तोडगा म्हणून शहाड उड्डाणपुलावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. असे असताना देखील येथून मोठी वाहने जात असल्याचे पाहण्यास मिळत आहे. परिणामी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. 

अर्धा- अर्धा तास ट्रॅफिकमध्ये अडकून 

वाहतूक पोलिसांनी नो- एन्ट्रीचे फलक लावून कार्यालयात निवांत बसल्यामुळे शहरातील प्रमुख रस्ते वाहतूक कोंडीत सापडले आहेत. या कोंडीत काही रुग्णवाहिकाही अडकल्या पाहायला मिळत आहे. तर भिवंडी वरून कल्याण शीळ रोडवर जाणाऱ्या वाहन चालकांना तर अर्धा अर्धा तास कसरत करत आपली वाहने या ट्रॅफिकमधून बाहेर काढावी लागत आहेत. 

नियोजनाअभावी वाहनधारक त्रस्त 

एकंदरीत वाहतूक पोलिसांनी फक्त आदेश काढून नो- एंट्री दिली असली, तरी प्रत्यक्ष रस्त्यावर वाहतुकीचे नियोजन न केल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. बेशिस्त वाहनचालकांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी अधिकच वाढली असून, वाहन चालकांकडून संताप व्यक्त होत आहे. नागरिकांचा स्पष्ट सवाल आहे की वाहतूक पोलिसांनी नियोजन करावं, अन्यथा ही कोंडी आणखी गंभीर होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील अंधेरीत घडली गोळीबाराची घटना

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत; दोन-तीन जणांना चावा घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

अखेर ठरलं! ZPत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार, निवडणुकीसाठी रणनीती ठरली

2 तासांचा प्रवास आता 7 मिनिटांत होणार; प्रवासाचा वेळ वाचणार, मलंगगडावरील फ्युनिक्युलर ट्रेन सुरू

Frizzy Hair: ड्राय आणि फ्रिझीनेसमुळे केसांची शाईन गेली? वापरा हा होममेड उपाय, आठवड्याभरात दिसेल फरक

SCROLL FOR NEXT