डोंबिवली : कल्याण– डोबिवली महानगर पालिकेच्या बनावट बांधकाम परवानग्या तयार करून आणि अनधिकृत बांधकाम करत त्यामधील फ्लॅट विक्री करत पालिकेची व ग्राहकांची फसवणूक केली. अशी फसवणूक करणाऱ्या 27 जणांवर (Dombivli) डोंबिवलीमधील मानपाडा पोलिस (Police) स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. (Kalyan Dombivli Corporation News)
केडीएमसी (KDMC) आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले, की अशा प्रकारे एकूण 68 परवानग्या बनावट कागदपत्रे तयार करून दिल्या गेल्याचे संबंधित विकासकांनी भासवले आहे. तसेच या परवानग्याच्या आधारावर त्यांनी रेराकडेही रजिस्ट्रेशन केल्याची माहिती आयुक्त डॉ. दांगडे यांनी दिली. या विकासकांवर गुन्हे दखल करण्यात आल्या असून रेरा संस्थेशी यासंदर्भात संपर्क साधण्यात येत आहे. केडीएमसीकडून विकासकांना देण्यात आलेल्या बांधकाम परवानग्या केडीएमसीच्या वेबसाईटवरही टाकल्या जात असून रेरा आणि आपली वेबसाईट जोडण्यात येणार आहे.जेणेकरून भविष्यात असे प्रकार घडणार नसल्याचेही आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले.
यांच्यावर झाले गुन्हे दाखल
नकुल वाळकु गायकर, वसंत हरिश्चंद्र म्हात्रे, शांताराम मंगल्या जाधव, रामसुरत गुप्ता, देवचंद पांडुरंग कांबळे, प्रदिप पंढरिनाथ ठाकुर, चंद्रशेखर एन. भोसले, प्रसाद जयकर शेट्टी, तुकाराम बाळु पाटील, अर्जुन जानू गायकर, अविनाश विठ्ठल म्हात्रे, अशोक मानिक म्हात्रे, अरुण प्रताप सिंग, सरबन बिंदाचल, संजय जोशी, चिराग गजानन पाटील, महेश जयकरन शर्मा, शेवंताबाई चुंदु पाटील, शांताराम मगल्या जाधव, मनोहर जाधव, अनिल दिनकर पाटील, सुभाष नामदेव म्हात्रे, जडावतीदेवी इंद्रजीत, नरेश बामा पाटील, राईबाई दत्तु काळण, पार्वतीबाई सुदाम काळण, शिवसागर गुरुदत्त यादव व इतर.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.