Dombivali Crime News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Crime News: कामावरून काढून टाकले तेथेच केली चोरी; कर्जबाजारी झालेल्या नोकराचे कृत्‍य

कामावरून काढून टाकले तेथेच केली चोरी; कर्जबाजारी झालेल्या नोकराचे कृत्‍य

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

कल्याण : डोंबिवलीत पूर्वेकडील एका चिकन शॉपचे शटर बनावट चवीने उघडुन दुकानातील १८ हजारांची रोकड व मोबाईल लंपास केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी (Dombivili) डोंबिवली रामनगर पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे. विकास बरबटे असे या चोरट्याचे नाव आहे. पोलीस (Police) तपासादरम्यान विकास हा याच चिकन शॉपमध्ये काम करत होता. काढून टाकल्‍याचा राग होता. त्यातच काम नसल्याने विकास कर्जबाजारी झाला होता. त्यातूनच त्याने दुकानात बनावट चावीच्या सहाय्याने शटर उघडुन चोरी (Theft) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Maharashtra News)

डोंबिवली पूर्व चार रस्ता परिसरात नथिंग बट या चिकन शॉपचे शटर अज्ञात चोरट्याने बनावट चावीच्या आधारे उघडुन दुकानात ठेवलेले १८ हजाराची रोकड व मोबाईल लंपास केला होता. याप्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा व तांत्रिक तपासाच्या आधारे एका चोरट्याला बेड्या ठोकल्या. विकास बरबटे असे या चोरट्याचे नाव आहे.

चार महिन्‍यांपुर्वी कामावरून काढले

विकास याच दुकानात कामाला होता. चार महिन्यांपूर्वी दुकानमालकाने त्याला कामावरून काढून टाकले होते. त्यामुळे त्याला तो बेरोजगार झाला होता. याचा राग विकासला होता. एकीकडे काम मिळत नसताना त्याच्यावर कर्ज देखील वाढले. कामावरून काढून टाकले. या रागातून विकासने त्या दुकानाची बनावट चावी बनवली. मध्यरात्रीच्या सुमारास या चावीच्या आधारे शटर उघडुन चोरी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aditi Rao Hydri: अदिती राव हैदरीचा नवा डेनिम कॉर्सेट आणि बबल स्कर्ट लूक पाहिलात का?

दिवाळीत धमाका! शिंदेंचा थेट फडणवीसांना धक्का, भाजपच्या एकनिष्ठ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra Politics: राज ठाकरे-उद्धव ठाकरेंचा पराभव निश्चित, निवडणुकीआधीच भाजप नेत्याची भविष्यवाणी

Leftover Chapati Recipe : रात्रीच्या चपात्या उरल्या? सकाळी नाश्त्याला बनवा 'हा' चटपटीत पदार्थ

EPFO News: पीएफचे पैसे काढण्यासाठी 12 महिने वाट पाहावी लागणार? जाणून घ्या नवीन नियम

SCROLL FOR NEXT