KDMC Budget Saam tv
महाराष्ट्र

KDMC Budget : कल्याण- डोंबिवलीकरांना दिलासा; केडीएमसीचा तीन हजार तीनशे कोटींचा अर्थसंकल्प, कोणतीही करवाढ नाही

Kalyan News : शिक्षण, आरोग्य व्यवस्था, लोकांसाठी घनकचरा व्यवस्थापनाची व्यवस्था, उद्यान व इतर नागरी सोयी सुविधा आर्थित तरतूद केली आहे. महापालिकेकडून सुरु असलेल्या प्रकल्पांना गती देण्यात आली आहे

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याण- डोंबिवलीच्या नागरीकांवर कोणतीही करवाढ न करता कल्याण डाेंबिवली महापालिकेने ३ हजार ३६१ कोटी रुपये खर्चाचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. या आर्थसंकल्पास महापालिका आयुक्त डॉ इंदूराणी जाखड यांनी मान्यता दिली आहे. अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आली नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.   

कल्याण- डोंबिवली महापालिकेकडून यंदाचा अर्थसंकल्प आज सादर केला. केडीएमसी आयुक्तांनी तीन हजार तीनशे कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. शिक्षण, आरोग्य व्यवस्था, लोकांसाठी घनकचरा व्यवस्थापनाची व्यवस्था, उद्यान व इतर नागरी सोयी सुविधा आर्थित तरतूद केली आहे. महापालिकेकडून सुरु असलेल्या प्रकल्पांना गती देण्यात आली आहे. महापालिका नागरीकांकरीता सीटीझन फ्रेंण्डली होईल, यासाठी ई गव्हर्नन्सवर भर दिला आहे. 

अत्याधुनिक पद्धतीने कचरा गोळा केला जाणार आहे. अत्याधुनीक वाहने, धूळ शमनसाठी वाहने. नागरीकांच्या तक्रारींचे निवारण विकसीत केले आहे. उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळी पावले उचलली आहे. महापालिका हद्दीतील मालमतांचे सर्वेक्षण करुन उत्पन्नात वाढ केली जाणार आहे. सरकारच्या नियमानुसार कॅपिटल व्हॅल्यू बेस करण्याकरीता सल्लागाराची नियुक्ती. टॅक्स लावणे आणि समजून घेणे सोपे होणार आहे. नवी कर आकारणी आहे. बेकायदा बांधकामांच्या कर आकारणीवर बंदी घातली गेली आहे. 

बेकायदा बांधकामाबाबत कडक निर्णय 

तसेच कल्याण डोंबिवली शहरात विविध रस्ते व फुलांचे काम सुरू आहेत. त्याला गती देण्यासाठी विविध उपाययोजना बजेटच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. बेकायदा बांधकाम आढळल्यास त्याचे निष्काशन करण्याकरीता येणाऱ्या खर्चाच्या दहा पटीने दंड आकारण्यात येणार आहे. जेणेकरून बेकायदा बांधकामांना आळा बसेल. बेकायदा पाणी कनेक्शन घेणाऱ्यांना मोठा आर्थिक दंड आकारण्यात येणार आहे. मालमत्तांचे सर्वेक्षण सुरु असून प्रत्येक मालमत्तेला नवी आयडी आणि जीआयएस मॅपिंग करुन घेणार आहे. पाणी कनेक्शनची माहिती घेणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्याला पाणी पुरवठा करणारी चार ही धरणे १०० टक्के भरले

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार, कोकणासह घाटमाथ्यावर कोसळणार जोरदार पाऊस

Success Story: त्सुनामित घर गेलं, शेतकऱ्याच्या लेकींनी जिद्दीने क्रॅक केली UPSC; एक IAS तर दुसरी IPS अधिकारी

Monday Horoscope : ५ राशींच्या लोकांच्या संसारात वाढणार गोडी गुलाबी; तर काहींचे होणार मतभेद, वाचा सोमवारचं राशीभविष्य

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

SCROLL FOR NEXT