Kalyan Corporation Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Corporation News: रस्ते सुस्थितीत असताना काँक्रीटीकरणासाठी साडेसात कोटी खर्चाचे पाच प्रस्ताव

Kalyan Corporation News: रस्ते सुस्थितीत असताना काँक्रीटीकरणासाठी साडेसात कोटी खर्चाचे पाच प्रस्ताव

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

कल्याण : कल्याण– डोंबिवली महापालिकेचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. (Kalyan) कल्याण डोंबिवली महापालिकेतील दोन रस्त्यांच्या काँक्रिटीकरनाचा प्रस्ताव संबधित विभागाने तयार केले. हे दोन्ही रस्ते डांबरी व सुस्थितीत असताना या रस्त्यांचा काँक्रिटकरणाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पालिका (Dombivli) आयुक्तांकडे पाठवला. मात्र पालिका आयुक्तांना संशय आल्याने हे सर्व प्रस्ताव रोखून धरले. इतकेच नव्हे तर आयुक्तांनी १५ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटिसा काढण्याचे आदेश दिलेत. (Breaking Marathi News)

कल्याण– डोंबिवली महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सावळा गोंधळ नेहमीच चर्चेचा विषय ठरला. असाच एक प्रकार पुन्हा एकदा समोर आला. कल्याण पश्चिमेतील फडके मैदान, म्हसोबा मैदान प्रभागातील डांबरी रस्ते सुस्थितीत असताना या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे साडे सात कोटी खर्चाचे पाच प्रस्ताव बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांच्या अपरोक्ष तयार केले. इतकेच नव्हे तर संबंधित विभागाकडून हे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आयुक्त डाॅ. दांगडे यांच्याकडे पाठविले. शहरातील बहुतांशी रस्ते सुस्थितीत आहेत. रस्ते कामांसाठी बेताचा निधी, दायित्व असताना फडके, म्हसोबा मैदान भागातील रस्त्यांचे प्रस्ताव बांधकाम विभागाने का तयार केले? असा सवाल करत हे प्रस्ताव तयार करणाऱ्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता अशा १५ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा काढण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाला दिले.

फाईल आठवडाभर गायब

गेल्या आठवड्यात या आदेशाच्या फाईल्स गायब झाल्याने हा सर्व प्रकार उघड झाला. दरम्यान या प्रकरणी महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. मात्र कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला. मात्र मधील आठ दिवस या फाईल कुठे गायब झाल्या होत्या? संबंधित अधिकाऱ्यावर महापालिका आयुक्त कारवाई करणार का? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गणेशोत्सव पार पडल्यानंतर मत्स्य खवय्यांची मासे खरेदीसाठी बाजारात गर्दी

Sangli : मानाचा नारळ ४१ हजार रुपये, कोथिंबीर जुडी २० हजारात खरेदी; महाप्रसादातील वस्तूंचा लिलाव

Akshay Kumar : गणपती विसर्जनानंतर अक्षय कुमार पोहचला जुहू बीचवर; हातात ग्लोव्हज घालून उचलला कचरा, पाहा VIDEO

बॉलिवूड अभिनेत्रीचा कारनामा! निर्मात्याला डांबून ठेवलं, बंदुकीचा धाक दाखवून १० लाख रूपये उकळले, सिनेसृष्टीत खळबळ

Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिराचा मोठा निर्णय! १०० कोटींची इमारत खरेदी करणार

SCROLL FOR NEXT