Kalyan Crime News, bazarpeth police SAAM TV
महाराष्ट्र

Kalyan Crime News : शेजाऱ्यांचं भांडण सोडवायला गेला; तरुणाने भावाच्या मित्राच्या कानाचा चावा घेत तुकडाच पाडला

Kalyan West Crime News : भांडण सोडवायला आला म्हणून नशेखोर तरूणाने शेजारच्या तरुणाच्या कानाला चावा घेत तुकडाच पाडला. कल्याण पश्चिमेकडे ही घटना घडली.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अभिजित देशमुख, कल्याण

Kalyan Crime News In Marathi : शेजारच्या घरात झालेले भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणे तरुणाच्या चांगलेच अंगलट आले. भांडण सोडवायला आला म्हणून नशेखोर तरूणाने शेजारच्या तरुणाच्या कानाला चावा घेत तुकडाच पाडला. कल्याण पश्चिमेकडे ही घटना घडली.

कल्याण बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणी अजीम खान या तरूणाला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नशेसाठी पैसे हवे होते म्हणून अजीमने घरात भांडण केले. शेजारी राहणाऱ्या तरुणाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण रागाच्या भरात अजीमने तरुणाच्या कानाला चावा घेतला आणि तुकडाच पाडला.

कल्याण पश्चिमेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड परिसरात अजीम खान हा तरूण राहतो. तो व्यसनी आहे. नशेसाठी तो घरातल्यांकडे वारंवार पैशांची मागणी करत असे. पैसे दिले नाहीत तर तो भांडणही करत असे. नशेसाठी त्याने घरातील वस्तू देखील विकल्या आहेत. (Latest Marathi News)

त्याने शुक्रवारी पैशांसाठी पुन्हा भांडण उकरून काढले. जोरजोरात आवाज येत असल्याने अजीमचा भाऊ आणि शेजारी राहणारा त्याचा एक मित्र अख्तर घरात गेले. त्या दोघांनी अजीम याला पकडून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र संतापलेल्या अजीम याने अख्तरच्या कानाला जोरदार चावा घेतला आणि त्याच्या कानाचा तुकडाच पाडला. (Crime News)

या प्रकरणी कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करीत अजीम याला अटक केली. पुढील तपास बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुजित मुंडे करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madhuri Elephant : माधुरी हत्तीणीवरून राजकारण पेटलं; राजू शेट्टींचं जुनं पत्र व्हायरल, पत्रात नेमकं काय लिहिलं?

Nashik News : माजी आयुक्ताला ईडीचा दणका; कोट्यवधींची मालमत्ता जप्त, एका कृत्याने संशय बळावला

Maharashtra Politics: सांगलीत राष्ट्रवादीचा बुरूज ढासळला, जयंत पाटलांचे विश्वासू भाजपात; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हाती घेतलं 'कमळ'

Rakshabandhan 2025: रक्षाबंधनात ओवाळणीच्या ताटात कोणत्या गोष्टी ठेवणे शुभ मानले जाते?

ITBP Bus Accident: धक्कादायक! जवानांची बस नदीत कोसळली, क्षणात झालं होत्याचं नव्हतं|VIDEO

SCROLL FOR NEXT