Kalyan Crime Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Crime News: दारूसाठी पैसे न दिल्याने रिक्षाचालकाला मारहाण

दारूसाठी पैसे न दिल्याने रिक्षाचालकाला मारहाण

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

कल्याण : दारुसाठी पैसे न दिल्याने एका रिक्षा चालकाला चार ते पाच जणांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण (Kalyan) पूर्व परिसरात घडली आहे. या हल्ल्यात रिक्षा चालकाला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी रिक्षा चालकाने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार (Police) पोलिसांनी अर्जुन म्हात्रे व त्याच्या तीन साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

कल्याण पूर्व सूचक नाका परिसरात विशाल डोंगरे हा तरुण राहतो. रिक्षा चालवून तो कुटुंबाचा उदनिर्वाह करतो. दरम्‍यान शनिवारी रात्रीच्या सुमारास विशाल याच परिसरात रिक्षा घेवून उभा होता. याच दरम्यान परिसरात राहणारे अर्जुन म्हात्रे व त्याचे तीन साथीदार त्या ठिकाणी आले. आम्हाला दारूसाठी पैसे दे असे विशाल याला सांगितले. मात्र विशालने नकार देताच त्याच्याशी हुज्जत घालत अर्जुन व त्याच्या साथीदारांनी विशालला लाथा बुक्क्यांनी, लोखंडी रॉडने मारहाण केली.

त्यानंतर रिक्षा स्टँडला गाडी उभी करू नको; अशी धमकी दिली. यावेळी मध्यस्थी करण्यास आलेला विशालच्या भावाला देखील मारहाण केली. गर्दी जमताच अर्जुन व त्याच्या साथीदारांनी तेथून पळ काढला. विशाल व त्याचा भाऊ जखमी झालेत. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात अर्जुन म्‍हात्रे व त्याच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Benefits: महिनाभर केळी खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो?

SBI बँकेत सिनेस्टाईल दरोडा; 58 किलो सोनं आणि 8 कोटी कॅश लुटलं|VIDEO

Jalna Rain : पावसाचा कहर; जालन्यात अतिवृष्टीत ९३ हजार हेक्टरवरील पिकांना फटका

Accident: पिंपरीमध्ये अपघाताचा थरार! भरधाव कारने सफाई कर्मचाऱ्याला चिरडलं, जागीच मृत्यू

Kalyan Doctors Strike : डॉक्टरांनी दिली संपाची हाक; आरोग्य यंत्रणा कोलमडणार, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT