Kalyan Crime Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Crime : फळ विक्रीच्या आडून मोठा प्लॅन; ठाण्याच्या पोलीस पथकाकडून मोठी कारवाई

Kalyan News : सचिन हा फळ विक्रेता असल्याचे भासवून या व्यवसायाच्या आडून तो गंभीर गुन्ह्यांची आखणी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे खंडणी पथकाने छापा टाकत कारवाई केली

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याणमध्ये ठाणे खंडणी विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. यात फळ विक्री करण्याच्या आडून गंभीर गुन्ह्यांची आखणी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ठाण्याच्या पोलीस पथकाने छापा टाकत कारवाई केली आहे. या कारवाईत संबंधित इसमास ताब्यात घेतले असून दोन गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस देखील जप्त केले आहे. 

कल्याणच्या बंदरपाडा परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत फळ विक्रेत्याच्या वेषात गुन्हेगारीचा डाव रचणारा सराईत सचिन गोपी उर्फ गोकुळ शिंदे (वय ३०) असे या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सचिन हा फळ विक्रेता असल्याचे भासवून या व्यवसायाच्या आडून तो गंभीर गुन्ह्यांची आखणी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे खंडणी पथकाने छापा मारून त्याला ताब्यात घेतले आहे. 

संशयितास ताब्यात घेत गुन्हा दाखल 

ठाणे शहराच्या खंडणी विरोधी पथकाने कल्याणच्या बंदरपाडा परिसरात कारवाई करत सचिन शिंदे याच्याकडून दोन गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस यासह अटक केली आहे. यानंतर सचिन शिंदेवर शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र पोलीस कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर न्यायालयाने त्याला ३० जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

कंटेनरने रस्त्यावरील सीसीटीव्ही तोडले 

कल्याण ९० फूट रोड परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास विरुद्ध दिशेने जाणाऱ्या कंटेनरने केडीएमसीचे सीसीटीव्ही तोडल्याची घटना घडली आहे. ९० फूट रोडवरील सात ते आठ सीसीटीव्हीचे नुकसान झाले आहे. मुळात या रस्त्यावरून अवजड वाहनांना प्रवेश बंदी असल्याने चोरून ९० फिट रोडने कंटेनर जात होते. या प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजपचे 100 नगरसवेक काँग्रेसच्या संपर्कात, बड्या नेत्याचा खळबळजनक दावा, राजकारणात भूकंप?

Tea-Coffee Avoid: चहा-कॉफी १५ दिवस बंद केल्यावर शरिरात होतात हे फायदेशीर बदल, डाइटपेक्षा हा बदल नक्की करा

IAS तुकाराम मुंढेंनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार; २१ वर्षांत २५ वी बदली

Children health in summer: पुढील 5 दिवस मुलांसाठी धोकादायक! नवतपामुळे देशभर उष्णतेचा कहर वाढणार

Yavatmal Accident: भरधाव टिप्परनं दोघांना चिरडलं; होमगार्डची तयारी करणाऱ्या तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT