Kalyan Crime Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Crime : खाऊ घ्यायला गेली, पुन्हा परतलीच नाही; कल्याणमधील १३ वर्षीय बेपत्ता मुलीचा मृतदेह आढळला

Kalyan Kolsewadi News: कल्याण पूर्वेतील चक्की नाका परिसरात वास्तव्यास असलेली १३ वर्षाची मुलीने सोमवारी सकाळी तिच्या आईकडून दुकानातून खाऊ आणण्यासाठी वीस रुपये घेतले. पैसे घेऊन दुकानात गेली असता घरी परतली नाही

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 

कल्याण : कल्याण पूर्वेत वास्तव्यास असलेली १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाली होती. दरम्यान या मुलीची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सदर मुलीचा मृतदेह कल्याण जवळील बापगाव परिसरात आढळून आला असून तिच्यावर अत्याचार झाल्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी कल्याण कोळशेवाडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

कल्याण पूर्वेतील चक्की नाका परिसरात वास्तव्यास असलेली १३ वर्षाची अल्पवयीन मुलीने सोमवारी सकाळी तिच्या आईकडून दुकानातून खाऊ आणण्यासाठी वीस रुपये घेतले. आईने दिलेले पैसे घेऊन ती दुकानात गेली असता घरी परत आली नाही. बराच वेळ झाल्यानंतर देखील मुलगी घरी न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. आठ ते नऊ तासांनंतर देखील मुलीचा तपास न लागल्याने कुटुंबीयानी यासंदर्भात कल्याणच्या कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. 

दुसऱ्या दिवशी मृतदेह आढळला 

कोळशेवाडी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करीत पुढील तपास करीत होते. याच दरम्यान दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी कल्याण नजीक असलेल्या बापगाव परिसरात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला. याबाबत कोळसेवाडी पोलिसांना माहिती मिळाली. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अपहरणाच्या गुन्ह्याबाबत तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांना घेत बापगाव येथे पोहोचले. 

मृतदेह पाहून वडिलांना बसला धक्का 

अल्पवयीन मुलीचा मृतदेह तिच्या वडिलांना दाखवण्यात आला असता वडिलांनी सदर मृतदेह आपल्याच मुलीचा असल्याचे सांगितले. मुलीचा गळा आवळून हत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच तिच्यासोबत लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून या संदर्भातली माहिती मृतदेहाच्या पोस्टमार्टम अहवालानंतर समोर येईल; असे पोलिसांनी सांगितले.  

दोन जणांवर संशय 

दरम्यान मुलीच्या वडिलांनी त्यांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर हत्या करण्यात आलीे. याबाबत दोन लोकांवर संशय असल्याचे सांगितले. पोलिसांनी लवकरात लवकर या प्रकरणाच्या तपास करून आरोपींना अटक करावे. दुकानातून मुलीला कोण घेऊन गेला. परिसरात लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर येईल.

तसेच या मुलीचा काही महिन्यापूर्वी विनयभंग झाला होता. याबाबत कोळसेवाडी पोलिसांनी कारवाई केली होती. मात्र मुलीच्या हत्या प्रकरणी आधीची जी घटना घडली आहे त्या घटनेशी संबंधित व्यक्तींचा यामध्ये काही समावेश आहे का? याचा तपास केला जात असून या प्रकरणात कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी पाच पथक तयार करून या प्रकरणातील आरोपींच्या शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Politics: भाजपची डोकेदुखी वाढली, अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली, नेमकं काय घडलं?

Pune Accident: नवले पुलावरून जाताना ब्रेक फेल, कंटेनर अनेक वाहनांना उडवत गेला; मृतांचा आकडा वाढण्याची भीती, थरकाप उडवणारा VIDEO

kalakand Recipe: संध्याकाळी गोड खायला आवडतं? मग, आज घरी नक्की बनवा हॉटेल स्टाईल कलाकंद, वाचा सोपी रेसिपी

Pune Navale Bridge Accident: काचांचा ढीग, वाहनं पेटली, ५ जणांचा जागीच मृत्यू पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात | VIDEO

Moisturizer For Winter: हिवाळ्यात तुमच्या त्वचेसाठी कोणता मॉइश्चरायझर आहे परफेक्ट, एकदा जाणून घ्या

SCROLL FOR NEXT