kalicharan maharaj  saamtv
महाराष्ट्र

Kalicharan Maharaj : कालिचरण वरील गुन्ह्याचा तपास रायपूर पोलिसांकडे वर्ग!

अकोल्याचा रहिवाशी असलेल्या कालीचरण महाराज याने रायपूर येथे महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द काढले होते. त्या वरून त्याच्यावर अकोला येथे गुन्हा झाला होता.

जयेश गावंडे

अकोला : अकोल्याचा रहिवाशी असलेल्या कालीचरण महाराज याने रायपूर येथे महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द काढले होते. त्या वरून त्याच्यावर रायपूर येथे गुन्हा झाला होता. अकोल्यात ही काँग्रेसच्या (Congress) पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करीत कालीचरणवर (Kalicharan) सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले होते. अकोला पोलिसांनी या प्रकरणी 27 डिसेंबर 2021 रोजी रात्री उशिरा गुन्हा नोंद करून झिरोची कायमी करून सदर गुन्हा रायपूर पोलिसांकडे वर्ग केला आहे.

हे देखील पहा :

छत्तीसगड (Chhattisgarh) राज्यातील रायपूर येथे हिंदु सभेच्या (Hindu Sabha) कार्यक्रमांमध्ये कालीचरणने महात्मा गांधी यांच्याबद्दल अर्वाच्च भाषा वापरली होती. यामुळे देशभरात संतापाची लाट पसरली होती. याप्रकरणी रायपुर पोलीस येथे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. यानंतर अकोल्यात देखील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सिटी कोतवाली पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास मनाई केल्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले होते.

काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या आंदोलनाला झुकून पोलिसांनी (Police) या प्रकरणी 27 डिसेंबर 2021 रोजी रात्री उशिरा भादंवी कलम 294, 505 (2) नुसार गुन्हा दाखल केला. सदर प्रकरण गुन्हा दाखल करीत झिरोची कायमी करून सिटी कोतवाली पोलिसांनी हे प्रकरण रायपुर पोलीस ठाण्याकडे वर्ग केले. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता रायपूर (Raipur) पोलीस करणार आहे.

दरम्यान, कालीचरणच्या वकिलाकडून अकोला (Akola) न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. नंतर याप्रकरणी अटकपूर्वच्या अंतिम अर्जावर सुनावणी पार पडली. कालीचरण महाराज याला अटक (Arrest) झाल्याने अटकपूर्व जामीन अर्ज वकिलांकडून परत घेण्यात आला असल्याचे समजते.

कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) विरोधात सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी झिरोची कायमी करून सदर प्रकरण हे रायपुर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. तसेच या संदर्भामध्ये न्यायालयातही कळविण्यात आले असल्याची माहिती सिटी कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कडू यांनी दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT