Court, Dharashiv, Osmanabad saam tv
महाराष्ट्र

Kalamb Court News : अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादणाऱ्या युवकाला 20 वर्ष सक्तमजुरी, ५० हजार रुपयांचा दंड

याच ओळखीचा गैरफायदा घेत युवकाने अल्पवयीन मुलीसोबत संबध ठेवले होते.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे 

Dharashiv News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी कळंबच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने युवकास (youth) २० वर्षाची सक्तमजुरी व ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे अल्पवयीन मुलीच्या आईने आज ख-या अर्थाने न्याय मिळाल्याचे नमूद केले. (Maharashtra News)

अल्पवयीन मुलीवर दुसऱ्या शेतात (farm) काम करणाऱ्या सालगड्याने वारंवार अत्याचार केल्याने मुलगी गरोदर राहिली हा प्रकार समोर आल्यावर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2 फेब्रुवारी 2021 रोजी पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीनुसार कळंब तालुक्यातील एका गावात ते उपजिवेकेसाठी आले होते.

तेथे त्यांची ओळख सालगडी सिध्दार्थ लक्ष्मण खंदारे यांच्यासोबत झाली. याच ओळखीचा गैरफायदा घेत सिध्दार्थने अल्पवयीन मुलीसोबत संबध ठेवले होते.

दरम्यान या प्रकरणी कळंब पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. पोलीस उपनिरीक्षक चैनसिंग गुसींगे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची नुकतीच अंतिम सुनावणी झाली.

कळंबच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायाधीश आर.के राजेभोसले यांनी संशयित आरोपी सिद्धार्थ खंदारे यास २० वर्षाची सक्तमजुरी व ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Online Shopping: ‘50% OFF’ पाहून वस्तू घेण्याआधी थांबा! आता बदलणार डिस्काउंटचा नियम

How To Create 80s Retro Photo: कोणताही Prompt न वापरता बनवा 80s च्या काळातील Vintage फोटो; AIचा नवा ट्रेंड व्हायरल

Sweet Corn Soup Recipe: संध्याकाळच्या भूकेसाठी झटपट घरी बनवा गरमागरम स्वीट कॉर्न सूप; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: पुण्यातील बुधवार पेठेत एफडीएची मोठी कारवाई

CJP Protest MPSC : MPSC विरोधात दिपके मैदानात; विद्यार्थ्याच्या आत्महत्येनं पेपरफुटीचा वाद पेटला, MPSC विरोधात CJP आंदोलन उभारणार?

SCROLL FOR NEXT