manoj Jarange  Saam tv
महाराष्ट्र

kailas borade : कैलास बोरडे मारहाण प्रकरणात ट्विस्ट, मंदिरात नको ते करत होता, व्हिडिओ दाखवत मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

Manoj Jarange on kailas borade : कैलास बोराडे हे मद्यधुंद आणि नग्न अवस्थेत मंदिरामध्ये नको ते करीत होते, असे व्हिडिओ समोर आलेत. मनोज जरांगे पाटील यांनी याबाबत व्हिडिओ समोर आणले आहेत.

डॉ. माधव सावरगावे

Manoj Jarange on kailas borade : जालन्यातील कैलास बोराडे यांच्या मारहाण प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. कैलास बोराडे हे मद्यधुंद आणि नग्न अवस्थेत मंदिरामध्ये नको ते करीत होते, असे व्हिडिओ समोर आलेत. मनोज जरांगे पाटील यांनी याबाबत व्हिडिओ समोर आणले आहेत. या प्रकरणाला कोणीही जातीय रंग देऊ नये असं त्यांनी म्हटले आहे.

कैलास बोराडे या तरूणाला अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. महाशिवरात्रीला मंदिरातच बोराडे याला जबर मारहाण झाली होती. त्याला जुन्या वादातून मारल्याचे म्हटले जात होतं. तापत्या लोखंडी रॉडने अमानुष चटके देण्यात आले होते. त्यात त्याला गंभीर दुखापत झाली होती. हे प्रकरण समोर आल्यानंतर राज्यभर संताप व्यक्त करण्यात येत होता. लक्ष्मण हाके, छगन भुजबळ यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांनी या प्रकरणी गंभीर आरोप करत आवाज उठवला होता. आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. मनोज जरांगेपाटील यांनी बोराडे यांचे व्हिडीओ दाखवत सवाल उपस्थित केलाय. त्याशिवाय याला जातीय रंग देऊ नये, असे आवाहन केलेय.

व्हिडीओत नेमकं काय ?

मनोज जरांगे यांनी काही व्हिडीओ दाखवले, ते सरकारला पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. व्हिडीओत बोराडे हा अर्धनग्न अवस्थेत मंदिरात दिसतोय. मद्यधुंद अवस्थेत तो मंदिरात आसल्याचा आरोप जरांगेंनी केला. तो कुणाशी तरी वाद घालत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर मंदिराच्या परिसरातच तो लोटांगण घेताना दिसतो. अश्लील चाळे करताना तो दिसत आहे. त्यावेळी तिथे एक तरूण बसलेला दिसतो. काही व्हिडिओ जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दाखवले आहेत.

मनोज जरांगे काय म्हणाले ?

हा व्यक्ती कोण आहे माहिती नाही. मात्र हिंदू असल्याने मला दाखवावा लागत आहे. महादेवाच्या समोर नंदी आहे आणि या नंदीच्या पाठीमागे अश्लील चाळे सुरु आहेत. हे अगोदर कधी बघितले नाही. यावर कठोर करावी झाली पाहिजे. हा व्यक्ती पँटची चैन खोलात आहे. दोन्ही पाय बाजूला ठेवून अश्लील चाळे करत आहे. यावर करावी झाली पाहजे. या लोकांवर मोका लावला पाहजे.अन्यथा आम्हाला आंदोलन हातात घ्यावं लागणार आहे. जालन्यात मारहाण झालेला व्यक्ती आहे असं तुम्ही सांगता, मी खात्री केली नाही हे सर्व व्हिडिओ सरकारकडे देणार आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT