Junnar Crime Saam tv
महाराष्ट्र

Junnar Crime : शेतमालाची चोरी करण्यास विरोध; बाजार समितीत तरुणांकडून व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला

Junnar News : रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नारायणगाव उपबाजारात घडली.

रोहिदास गाडगे

जुन्नर : शेतमालाची चोरी करण्यासाठी काहीजण आले होते. मात्र त्यास येथील व्यापाऱ्याने विरोध केला होता. विरोध केल्याचा राग मनात धरून नारायणगाव बाजार समितीमध्ये एका तरुणाने व्यापाऱ्यावर कोयत्याने प्राण घातक हल्ला केला. यात सदर व्यापारी जखमी झाला आहे. 

नारायणगाव बाजार समितीमध्ये हि घटना घडली असून राजगुरुनगर (ता. खेड) येथील व्यापारी गणेश एरंडे हे जबर जखमी झाले आहेत. सदरची घटना रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नारायणगाव उपबाजारात घडली. (Crime News) व्यापारी गणेश एरंडे यांच्यावर खेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या तरुणावर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Bajar Samiti) सचिव रुपेश कवडे, संचालिका प्रियंका शेळके,माउली खंडागळे यांनी निवेदनाद्वारे नारायणगाव पोलिसात केली आहे.

अद्याप हल्लेखोरांना अटक नाही 

सदरच्या घटनेला तीन दिवस होऊन देखील पोलिसांकडून अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. तर बाजार समितीच्या संचालिका प्रियांका शेळके यांनी याबाबत नारायणगाव पोलिसांत निवेदन देऊन थेट पोलिस स्टेशनमधून सोशल मीडियावरून केलेल्या लाईव्हमूळे ही घटना तालुक्यात वाऱ्यासारखी परसली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सांगलीकरांची उडाली दैना

Pune Traffic : चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वर्ध्यात सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक; गार्डसह ३ ते ४ प्रवासी जखमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे, तरीही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Principal Bribery Case: मुख्याध्यापकाला अटक, लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं; नांदेडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT