नवेगांव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात आज पासून जंगल सफारी सुरु SaamTv
महाराष्ट्र

नवेगांव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात आज पासून जंगल सफारी सुरु

नवेगांव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी आज शनिवार 26 जून पासून 30 जून पर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजीत घोरमारे

गोंदिया : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या लाटेपासून दुसऱ्या लाटेपर्यंत लॉकडाऊन राहिल्याने गोंदिया जिल्ह्यातील नवेगांव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे वन्यजीव आणि पर्यावरण प्रेमींना जवळपास दिड वर्ष वन्यप्राण्यांचे दर्शन घेता आले नव्हते. Jungle safari starts from today at Navegaon-Nagzira tiger project

हे देखील पहा -

मात्र आता कोरोनाची दूसरी लाट हळूहळू ओसरत असून परिस्थिति नियंत्रणात येत आहे. राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमीकमी होऊ लागल्यामुळे शासनाने बऱ्यापैकी निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून बंद असलेलं पर्यटन क्षेत्र देखील आता पूर्वपदावर येऊ लागले आहे.

विशेषतः संपूर्ण राज्यात गोंदिया जिल्ह्याचा पोझिटीवीटी रेट कमी असल्याने परिणामी शासनाने व्याघ्र प्रकल्पांना खुले करण्यास परवानगी दिली आहे. नवेगांव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी आज शनिवार 26 जून पासून पुढील 5 दिवस 30 जून पर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहे. 5 दिवसच का होईना पण पर्यटकांना जंगल सफारीच्या आनंद लुटता येणार आहे. त्यामुळे वन्यप्रेमी आणि पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे नवे अध्यक्ष रोहित पवार

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

Reshma Shinde: माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात...

SCROLL FOR NEXT