fraud SaamTVNews
महाराष्ट्र

न्यायाधीशांनाच पावणे तीन लाखांचा गंडा

या प्रकरणी नागपूर मधील सिताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : नागपुरात न्यायाधीशांचाच (judges) मोबाईल हॅक करुन पावणे तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नागपूर मधील सिताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी (Police) दिलेली माहिती अशी, सोनाली कनकदंडे (वय ४२, रा.सिव्हिल लाइन्स) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. सोनाली कनकदंडे या न्यायाधीश आहेत. १४ मे रोजी त्यांना फास्ट टॅग रिचार्ज करायचे होते. त्यांनी गुगलवर फास्ट टॅगचे अ‍ॅप सर्च केले. त्यांनी मोबाइलमध्ये अ‍ॅप डाऊनलोड करीत फास्ट टॅग रिचार्ज केले.

याच दरम्यान सायबर गुन्हेगाराने त्यांचा मोबाइल हॅक केला. त्यांच्या बँक खात्यातून दोन लाख ७५ हजार रुपये अन्य खात्यात वळते केले. याबाबत कळताच सोनाली कनकदंडे यांनी सीताबर्डी पोलिसांत तक्रार केली. नागपुरातील सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सायबर गुन्हेगाराचा तपास सुरू केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pankaja Munde Education: उपमुख्यमंत्र्याची लेक ते भाजपच्या नेत्या; पंकजा मुंडेचं शिक्षण किती?

Maharashtra News Live Updates : शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही विधानसभा जिंकणार - देवेंद्र फडणवीस

Ananya Panday: अनन्याची कातिल अदा, फोटोंनी उडवला धुराळा

Spring Onion: कांद्याच्या पातीचे 'हे' आहेत जबरदस्त फायदे

Flight in WIFI : फ्लाइट मोडचा जमाना गेला! आता विमानात मनसोक्त इंटरनेट वापरता येणार, कसं? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT