Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत परळीत 201 बुथ कॅप्चर केल्याचा दावा आव्हाडांनी केलाय. तर वाल्मिक कराडच्या गँगने बुथ कॅप्चर केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय. याच बुथ कॅप्चरिंगवरचा हा स्पेशल रिपोर्ट.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गुन्हेगारीच्या परळी पॅटर्नची चर्चा सुरु झालीय.. त्यातच पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी परळीतील बुथ कॅप्चरिंगचा व्हिडीओच सोशल मीडियावर शेअर केलाय.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास बंदी आहे.. मात्र या व्हिडीओ गोट्या गित्ते मतदान करत असताना त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला जातोय आणि दुसरा व्यक्ती गोट्या गित्तेचा व्हिडीओ काढताना दिसतोय.. त्यामुळे हे बुथ कॅप्चरिंग असल्याचं आव्हाडांनी म्हटलंय.. तर दुसरीकडे परळीत बुथ कॅप्चरिंग कशी होते? त्याचा पाढाच पराभूत उमेदवार राजेसाहेब देशमुखांनी वाचलाय.. तर परळीत वाल्मिक कराड गँगने पोलिसांसमोरच 201 बुथ कॅप्चर करून मतदारांच्या बोटाला शाई लावून बाहेर काढलं असा आरोप आव्हाडांनी केलाय.. बुथ कॅप्चरिंगवरुन संतप्त झालेल्या जितेंद्र आव्हाडांनी निवडणूक आयुक्त चोक्कालिंगम यानाच थेट सवाल केलाय.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा संशयित आरोपी असल्याने आधीच धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.. त्यातच आता जितेंद्र आव्हाडांनी व्हिडीओ ट्वीट करत परळीतील बुथ कॅप्चरिंगवरून थेट धनंजय मुंडेंना लक्ष केलंय... तब्बल 201 बुथ कॅप्चर केल्याचा खळबळजनक आरोपही केलाय.. सरकारी आकडेवारीनुसार मात्र अवघ्या 4 मतदान केंद्रावर गैरप्रकार झाल्याचं समोर आलं... त्यामुळे निवडणूक आयोग या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून लोकशाहीचा गळा घोटणाऱ्यांना धडा शिकवणार की आव्हाडांच्या टीकेकडे दुर्लक्ष करणार? याकडे लक्ष लागलंय..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.