Maha Vikas Aghadi : "काँग्रेस मोडलेली, शिवसेना झोपलेली" अमोल कोल्हेंनी डिवचलं, वडेट्टीवार- राऊतांचाही निर्वाणीचा इशारा

Maha Vikas Aghadi Issue : विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत पराभवाचं खापर एकमेकांवर फोडण्याची स्पर्धा सुरु आहे. पराभवाने खचलेल्या मविआमध्ये नेमकं काय सुरु आहे, याचा खास रिपोर्ट
Maha Vikas Aghadi Internal Issue
Maha Vikas Aghadi Internal IssueSaam Tv (Youtube)
Published On

भरत मोहळकर साम प्रतिनिधी

Maha Vikas Aghadi : दिल्लीत इंडिया आघाडीला तडा गेला असतानाच आता महाविकास आघाडीतील खदखदही समोर आलीय. अमोल कोल्हेंनी काँग्रेस आणि ठाकरे गटाला डिवचलंय. त्यामुळे थेट महाविकास आघाडीही मोडीत निघणार की काय असं वक्तव्य ठाकरे गटाकडून आलंय. नेमका हा वाद का पेटलाय आणि पराभवानं खचलेल्य़ा मविआत नेमकं काय सुरू आहे त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत पराभवाचं खापर दुसऱ्यावर फोडण्यासाठी स्पर्धाच लागलीय. त्यातच निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची एकही बैठक न झाल्याने अमोल कोल्हेंनी थेट काँग्रेस आणि ठाकरे गटावर हल्लाबोल केलाय.. विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही तर ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा झाला नसल्याचा टोला अमोल कोल्हेंनी पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत लगावला. त्यामुळे महाविकास आघाडीतील दरी आणखीच वाढलीय.

मात्र अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले? पाहूयात.

- अमोल कोल्हेंचा मित्रपक्षांना टोला (सूत्रांची माहिती)

- विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाही.

- शिवसेना अजूनही झोपेतून जागी झालेली नाही.

- मित्र पक्षांच्या अशा वागण्यामुळे शरद पवार गटाला विरोधी पक्ष म्हणून वाढण्यासाठी मोठी जागा.

- पराभव हा आधी मनात आणि त्यानंतर रणांगणांत होतो त्यामुळे मरगळ झटका आणि कामाला लागा.

- तुमच्याकडे लढणारे शरद पवार आहेत, लक्षात ठेवा बचेंगे तो और भी लढेंगे!

अमोल कोल्हेंची टीका काँग्रेसच्या चांगलीच जिव्हारी लागलीय. महाविकास आघाडीच्या पराभवासाठी तीन्ही पक्ष जबाबदार असल्याकडे वडेट्टीवारांनी बोट दाखवलंय. तर महाविकास आघाडीत ठिणगी पडली असताना राऊतांनी हा विषय इंडिया आघाडीवर नेलाय. इंडिया आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर असल्याने राऊतांनी काँग्रेसला निर्वाणीचा इशारा दिलाय.

Maha Vikas Aghadi Internal Issue
Devendra Fadnavis Interview : राजकारणात काहीही होऊ शकतं; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य

एकीकडे दिल्लीत आप विरुद्ध काँग्रेस संघर्ष रंगल्याने इंडिया आघाडीत फूट पडलीय.. त्यातच आता राज्यातही महाविकास आघाडीतील खदखद समोर आलीय.. त्यामुळे इंडिया पाठोपाठ महाविकास आघाडीतही फुटीची चर्चा रंगलीय.. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी फुटणार की पुन्हा शरद पवार, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे आपापसातील मतभेद विसरुन पुन्हा नव्याने रणशिंग फुंकणार? याकडे लक्ष लागलंय.

Maha Vikas Aghadi Internal Issue
Nashik Civic Elections: शिंदेंचा काँग्रेसला धक्का! शिवसेनेत इन्कमिंग सुरूच, काँग्रेसच्या शिलेदारांचा पक्षाला जय महाराष्ट्र

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com