Bihar and Maharashtra Voter Lists Missing saam tv
महाराष्ट्र

Jitendra Awhad: 'बिहार,महाराष्ट्राच्या मतदार याद्या गायब'; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

Bihar and Maharashtra Voter Lists Missing: महाराष्ट्रातील मतदार याद्या गायब आहेत, असा खळबळजनक आरोप राहुल गांधींपाठोपाठ जितेंद्र आव्हाडांनी केलाय. त्यामुळे निवडणूक आयोग कोंडीत सापडलाय. त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Bharat Mohalkar

  • जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप – बिहार, महाराष्ट्र मतदार याद्या गायब.

  • राहुल गांधींनीही यापूर्वी असा आरोप केल्याची आठवण.

  • निवडणूक आयोगावर विरोधकांचा दबाव वाढला.

  • मतदान प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह.

राहुल गांधींनी कर्नाटकच्या महादेवपुरात 1 लाख 250 बोगस मतदार पुराव्यासह उघड केले.. आणि देशातील नागरिक अलर्ट झालेत. गांधींच्या आरोपानंतर नागरिकांनी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर बोगस मतदारांचा शोध मोहीम सुरु केलीय. त्याच पार्श्वभुमीवर जितेंद्र आव्हाडांनी महाराष्ट्र, बिहार आणि मध्य प्रदेशच्या मतदारयाद्या वेबसाईटवरुन गायब असल्याचा आरोप केलाय.

चोरी लपवण्यासाठी आयोगाची धावपळ सुरु

गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर लोकांच्या उत्सुकतेत वाढ

आयोगाकडून महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेशच्या मतदारयाद्या वेबसाईटवरुन गायब

सध्या वेबसाईटपर्यंत पोहचता येत नाही

चोराने चोरी केली हे पुराव्यानिशी सिद्ध

चोरी सिद्ध झाल्याने चोराने लपवाछपवी केली तरी काय फरक पडतो?

एवढंच नाही तर चोर के दाढी में तिनका म्हणत आव्हाडांनी निवडणूक आयोगाला डिवचलंय

दुसरीकडे निवडणूक आयोगाने मात्र महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानच्या निवडणूक आयोगाची वेबसाईट बंद नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय. तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी एक यादी ट्वीट करत एकाच व्यक्तीचे 42 मुलं कशी? असा सवाल उपस्थित केलाय. त्यामुळे निवडणूक आयोगाची आणखीच कोंडी झालीय. त्यामुळे आव्हाडांच्या आरोपांवर निवडणूक आयोग नेमकं काय उत्तर देणार आणि वेबसाईटवर सहजरित्या मतदारयादी मिळावी, अशी व्यवस्था केली जाणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : संभाजीनगरात भयंकर अपघात, बापाच्या डोळ्यासमोर दोन्ही लेकरांचा मृत्यू, मुलीला पाहून धाय मोकलून रडले

Maharashtra Live News Update : शिरुर नगरपरिषदेत आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला, महिला उमेदवार मैदानात

Lonavala Mega Block: मुंबई-पुणे रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! पुढील १० दिवस मेगा ब्लॉक; VIDEO

Ayurvedic Kadha Recipe : हिवाळ्यात सर्दी - खोकल्यापासून राहाल दूर, रोज प्या 'हा' आयुर्वेदिक काढा

Gratuity Calculation: पगार ₹५०,०००... तर १, २, ३ आणि ४ वर्षानंतर किती ग्रॅच्युटी मिळणार? तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

SCROLL FOR NEXT