Jejuri Somvati Amavasya 2023 Saamtvnews
महाराष्ट्र

Jejuri Somvati Amavasya 2023: यळकोट यळकोट जयमल्हार! सोन्याच्या जेजुरीत सोमवती यात्रेचा उत्साह; गडावर लाखो भक्तांची गर्दी

अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या श्री खंडोबा देवाच्या मंदिरात आज सोमवती यात्रेचा उत्साह पाहायला मिळत आहे.

मंगेश कचरे

Jejuri Gad Khandoba Yatra 2023: अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या श्री खंडोबा देवाच्या मंदिरात आज सोमवती यात्रेचा उत्साह पाहायला मिळत आहे. जेजुरीच्या खंडेरायाची सर्वात मोठी यात्रा या सोमवती अमावस्येला भरत असते. या यात्रेला कालपासूनच राज्यभरातील भाविकांनी गर्दी केली असून २ ते ३ लाख भाविक जेजुरीत दाखल झाले आहेत. (Jejuri Yatra Latest News)

याबाबत अधिक माहिती अशी की, अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी (Jejuri) गडावर आज सोमवती अमावस्या यात्रा साजरी होत आहे. या यात्रेनिमित्त राज्यातून नव्हे तर परराज्यातून हजारो भाविक जेजुरी नगरीमध्ये दाखल झाले आहेत. आज दुपारी एक वाजता खंडोबा देवाची पालखी कऱ्हा स्नानासाठी गडावरून पालखीचे प्रस्थान झाले.

भंडाऱ्याची उधळण करत मोठ्या भक्तीभावाने हा पालखी सोहळा सुरू झाला. हा पालखी सोहळा कऱ्हा नदीकडे मार्गस्थ झाला असून या ठिकाणी उत्सव मुर्तींना स्नान घालण्यात येते. सकाळपासून भाविकांनी गडावर खंडोबाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे.

या क्षणाला भंडारा उडवतं मोठ्या उत्साहाने खंडोबाचं नाव घेतात. यळकोट यळकोट जय मल्हार या घोषणांनी भाविक मोठ्या आंनदाने हा क्षण साजरी करतात. खंडोबारायाच्या जेजूरी गडावर सोमवती यात्रेला विशेष महत्त्व दिले जाते. हिंदू धर्मांच्या परंपरेनुसार जेजुरीच्या खंडोबाच्या गडावर सोमवती यात्रा पाहायला आहे. या यात्रेत भविक मोठ्या संख्येने आणि भक्तीभावाने सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शरद पवारांची सोशल मीडियावरून चेतन तुपेंवर टीका

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

High Court : भिकारी बोलणं अपमानजनक नाही, न्यायालयाचं महत्त्वपूर्ण मत

General Knowledge: दारू व्हेज की नॉनव्हेज? काय आहे खरं उत्तर?

Success Story: १५०० रूपयांच्या बिझनेसला ३ कोटींपर्यंत पोहोचवलं, जाणून घेऊया संगीता यांची यशोगाथा

SCROLL FOR NEXT