Jejuri Accident Saam Tv News
महाराष्ट्र

Jejuri Accident: यात्रेनिमित्त जेजुरीला जाणाऱ्या वाहनाचा अपघात, २ जण ठार; १४ जण गंभीर जखमी

Jejuri Road Accident: जेजुरी दर्शनासाठी येणार्‍या भाविकांचा बेलसर वाघापूर रस्त्यावर पिकअप ट्रक आणि आयशर गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून, १४ जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.

Bhagyashree Kamble

जेजुरी दर्शनासाठी येणार्‍या भाविकांचा बेलसर वाघापूर रस्त्यावर पिकअप ट्रक आणि आयशर गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून, १४ जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. पिकअप ट्रकमधील भाविक दर्शनासाठी जात होते. मात्र, रस्त्यावर त्यांचा अपघात झाला. सध्या जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

जेजुरी गडावर भाविकांची दर्शनासाठी बाराही महिने रेलचेल सुरू असते. सोमवती यात्रेनिमित्त भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. मात्र सोमवारी ३० डिसेंबरला बेलसर वाघापूर रस्त्यावर पहाटे अडीच वाजता दोन वाहनांचा अपघात घडलाय. पिकअप ट्रक आणि आयशर गाडीचा अपघात घडला असून, या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १४ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

सोमवती यात्रेनिमित्त प्रवासी जरेवाडी येथून सर्व भाविक जेजुरीला, खंडोबा देवाच्या देवदर्शनासाठी निघाले होते. मात्र, प्रवास करीत असतानाच पिकअप ट्रक आणि आयशर गाडीची एकमेकांना धडक बसली. हा अपघात पहाटे अडीच वाजता घडला. या अपघातात पिकअप गाडीतील जितेंद्र तोतरे आणि आशाबाई जरे या दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

तर, १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त व्यक्तींवर जेजुरी येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून, जखमी झालेल्या व्यक्तींच्या हाता - पायांना मोठी दुखापत झाली असल्याची माहिती आहे. हा अपघात घडल्यानंतर जेजुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न केला. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, जेजुरी पोलीस या अपघाताचा सखोल तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT