Pandharpur Ashadhi Wari Accident विजय पाटील
महाराष्ट्र

आषाढी वारीसाठी निघालेल्या दिंडीत घुसली जीप; १४ वारकरी जखमी

आषाढी पायीवारी सोहळ्यासाठी पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकाऱ्यांच्या दिंडीमध्ये जीप घुसल्याने अपघात झाला आहे.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : आषाढी पायीवारी सोहळ्यासाठी पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकाऱ्यांच्या (Warkari) दिंडीमध्ये जीप घुसल्याने अपघात झाला आहे. या अपघातात १४ वारकरी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. (Pandharpur Ashadhi Wari)

सध्या राज्यभारातील वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाच्या ओढीने पंढरपूरच्या (Pandharpur) दिशेने निघाले आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा ज्याप्रमाणे पंढरपुराकडे मार्गस्थ होतो. त्याप्रमाणेच राज्यभरातील अनेक गावांमधून छोट्या छोट्या दिंड्या जात असतात.

अशीच एक पायी दिंडीवारी पंढरपूराकडे जात असताना मिरज-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गवरील केरेवाडी फाट्याजवळ वारकरच्या दिंडीत पिकअप जीप घुसल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात झाला असून यामध्ये जवळपास १४ वारकरी जखमी झाले आहेत.

दरम्यान, या जखमींना मिरज सिव्हिल आणि कवठेमहांकाळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर अपघातानंतर जीप ड्रायव्हर पळून गेला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

Gold Rate : लक्ष्मीपूजनाला सोन्याची दिवाळी, तब्बल 3 हजार 300 रुपयांनी महागलं, वाचा आजचे दर

Jalna Police : दारूची अवैध तस्करी; जालना पोलिसांची कारवाई, आठ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

Box Office Collection: कांताराची दिवाळीत बंपर कमाई; लवकरच पार करणार ६०० कोटींचा टप्पा

Sachin Pilgaonkar : महागुरू सचिनचा नवा दावा, माझं गाणं 'त्यांनी' ऐकलं अन् अखेरचा श्वास घेतला

SCROLL FOR NEXT