Jaykumar Gore News : मंत्री जयकुमार गोरे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. एका महिलेने गोरे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मंत्री गोरे यांच्यावर अधिवेशनातही टीका झाली. यावरून खासदार संजय राऊत आणि आमदार रोहित पवार यांच्यावर हक्कभंग आणला होता. आरोपानंतर गोरे यांच्या विरोधात तक्रार देणारी महिला खंडणीच्या आरोपाअंतर्गत पोलिसांच्या ताब्यात आहे. आरोपामुळे चर्चेत असलेले मंत्री जयकुमार गोरे आता त्यांच्या मुलामुळे चर्चेत आले आहेत.
राज्य सरकारमधील मंत्री जयकुमार गोरे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. 'मी शरद पवारांना मंत्री झाल्याचं अद्याप पचलेले नाही. माझं राजकारण संपलं तरी चालेल. पण मी बारामती आणि शरद पवारांच्या पुढे कधीही झुकणार नाही, असं जयकुमार गोरे यांनी म्हटलं होतं. गोरे यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेमुळे चर्चेत आले होते. अशातच मंत्री जयकुमार गोरे यांच्या मुलाची स्टंटबाजी समोर आली आहे. मुलाच्या स्टंटबाजीमुळे मंत्री गोरे अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जयकुमार गोरे यांचा मुलगा आदित्यराज याने कोल्हापूर रोडवर भरधाव वेगाने बाईक चालवत स्टंट केला. आदित्यराजच्या स्टंटचा फोटो आणि व्हिडिओ भैया पाटील यांनी एक्सवर पोस्ट केले आहेत. भैया पाटील यांनी मुलाच्या स्टंटबाजीवरून मंत्री जयकुमार गोरे यांना सवाल केला आहे. आदित्यराजचा स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चहूबाजूंनी टीकेची झोड उठली आहे.
आदित्यराजच्या स्टंटबाजीवरून नेटकऱ्यांकडून टीका केली जात आहे. मंत्री जयकुमार गोरे यांचा मुलगा आदित्यराजने त्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. नेटकऱ्यांकडून टीका होताच त्याने व्हिडिओ डिलीट केला.
भैया पाटील यांनी 'एक्स' पोस्टवर म्हटलं आहे की, मंत्री जयकुमार गोरे यांचा मुलगा आदित्यराज हा सातारा कोल्हापूर रोडवर जीवघेणे स्टंट करतोय. तो स्टंट करून स्वतः सोबत इतर लोकांच्या जीवाला धोका निर्माण करतोय. त्याने स्टंटचे रील्स लाईव्ह स्वतःच्या सोशल मीडियावर टाकून बेकायदेशीर गोष्टीला प्रोत्साहित दिले आहे. त्याच्या बाईकला नंबर प्लेटसुद्धा नाही. कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांच्या मुलासाठी महाराष्ट्रात राज्य सरकारने वेगळे नियम आणि कायदे बनवले आहेत का?ही बाब सर्व सामान्य व्यक्तीने केली तर त्याची गाडी जप्त करून मोठा दंड ते 3 महिन्यापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा केली जाते'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.