jayant patil News 
महाराष्ट्र

jayant patil : ...तर शेतकऱ्यानंतर राज्यात कॉन्ट्रॅक्टरांच्या आत्महत्या सुरू होतील, जयंत पाटलांचा टोला

jayant patil on BJP : आता आमच्या पक्षाकडे कॉन्ट्रॅक्टर नाही, सगळे पक्ष सोडून सत्तारूढ पक्षाकडे गेले. ठेकेदारांचे पैसे दिले नाहीत तर शेतकऱ्यानंतर राज्यात कॉन्ट्रॅक्टरांच्या आत्महत्या सुरू होतील, असे विधान जयंत पाटील यांनी केलेय.

Namdeo Kumbhar

jayant patil News : राज्यातल्या बांधकाम विभागाकडील कॉन्ट्रॅक्टरांच्या थकीत देणीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला टोला लगावला आहे. मी सांगत होतो, लय कॉन्ट्रॅक्ट घेऊ नका, आता आमच्या पक्षाकडे कोणी कॉन्ट्रॅक्टर राहिले नाहीत, सगळे कॉन्ट्रॅक्टर सत्तारूढ पक्षाकडे गेले आहेत, अशी मिश्किल टोलेबाजी जयंत पाटलांनी केली आहे.

बांधकाम खात्यात 60 ते 70 हजार कोटींची कामे घेतली आहेत, त्यामुळे पैशाची जुळणी कशी करायची? हा प्रश्न आम्हाला पडायची गरज नाही. अर्थमंत्र्यांना पडेल, असा टोला अजित पवारांना लागवला आहे. तर 31 मार्च अखेर 18 हजार कोटी दिली नाहीत,तर कॉन्ट्रॅक्टरांची पंचाईत होईल. कॉन्ट्रॅक्टरांची बाजू मांडली नाही तर देशात शेतकरी आत्महत्या नंतर कॉन्ट्रॅक्टरांच्या आत्महत्या सुरू होतील, अशी भिती देखील आमदार जयंत पाटलांनी व्यक्त केली. ते सांगलीच्या कुंडल येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

आता आम्ही लाडक्या बहिणीच्या बाजूंनी, पैसे बंद होणार यासाठी लढा उभारणार - जयंत पाटील

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्रतेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती सरकारला टोला लगावला आहे. आता आम्ही लाडक्या बहिणीची बाजू घेऊन काम करणार आहे. लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार नाहीत, यासाठी आमचा लढा राहणार आहे. आम्ही त्यांचे मागे आहोत, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जाहीर केली.

लाडकी बहीण योजनेतील अपात्रतेवरून आमदार जयंत पाटलांनी ही भूमिका जाहीर केली. सांगलीच्या कुंडल येथे आयोजित कार्यक्रम होते ते बोलत होते, लाडक्या बहिणींनी तुम्हाला मते दिली आहेत, त्यांना तुम्ही शब्द दिला आहे, त्यामुळे एकदा दिले तर दिले, त्यांनी मतं दिली आहेत, त्यामुळे बघून द्यायचे होते, आम्ही घाई करा म्हणत होतो का ? अश्या शब्दात महायुतीला खोचक टोला लगावत जयंत पाटलांनी महायुतीवर निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे फाईल बाहेर काढणाऱ्या अंजली दमानियांच्या पतीवर सरकार खूश; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Cat Worshipped As Goddess: 'या' देशात मांजरींची होते देवाप्रमाणे पूजा; भक्त अर्पण करायचे सोन्याचे दागिने

Dhananjay Munde : बंजारा-वंजारा एकच? धनंजय मुंडेंच्या विधानानं वाद पेटला, वाचा स्पेशल रिपोर्ट

OBC Reservation : कुणबी बोगस प्रमाणपत्रांची सखोल पडताळणी होणार; मंत्री बावनकुळे यांच्यांकडून प्रशासनाला आदेश

Attack On Shiv Sena Leader: शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविकेच्या घरावर हल्ला

SCROLL FOR NEXT