Harshvardhan Patil Harshvardhan Patil
महाराष्ट्र

Indapur : हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी जवळपास निश्चित, जयंत पाटील यांचं भरसभेत संकेत!

Namdeo Kumbhar

Indapur Harshvardhan Patil : भाजपातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या हर्षवर्धन पाटील यांची इंदापूरमधून उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. कारण, इंदापूरमधील सभेत जयंत पाटील यांनी तसे संकेत दिले आहेत. भाजपला सोडचिठ्ठी देत हर्षवर्धन पाटील यांनी आज तुतारी हातात घेतली. इंदापूरमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

काय म्हणाले जयंत पाटील?

जागावाटप निर्णय झाल्याशिवाय उमेदवारी जाहीर करता येत नाही. मी त्यांना तुतारी हातात देतोय. कार्यकर्त्यांची चर्चा केली आणि मग तिकडे गेलो इकडे गेलो आता कार्यकर्त्यांची चर्चा नाही हे फायनल आहे, असे म्हणत जयंत पाटील यांनी एकप्रकारे हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर केली.

इंदापूरची जागा आम्हाला निवडून आणायची आहे. दोन दिवसात काही निर्णय होतील. ती मानसिकता असणाऱ्या आमच्या महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी लोक आज राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी उत्सुक झालेली आहे.

सुधारणा करायला आमच्या मार्गाने यायचं विचार करा. या मतदारसंघातल्या सर्वांना माझा आव्हान आहे की पवार साहेब सामाजिक समतोल ढळू न देता पक्ष चालवतात. इंदापूरमध्ये विजय आवश्यक आहे, म्हणून आम्ही आग्रहाने हर्षवर्धन पाटील यांना निमंत्रित केलं आणि ते आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले.

२०१९ ज्या विधानसभा निवडणुकीवेळी अनेक लोक सोडून गेले. नेत्याच्या मागे उभा राहण्याची महाराष्ट्राची मराठी माणसाची पद्धत आणि मानसिकता आहे. दिल्लीवाल्यांनी जेव्हा जेव्हा जबरदस्ती केली, तेव्हा तेव्हा शरद पवार साहेबांनी मराठी स्वाभिमान दाखवण्याचं काम केलं. 2019 साली हर्षवर्धन पाटील साहेब हे भारतीय जनता पक्षाच्या काही प्रश्नांमुळे गेले, हर्षवर्धन भाऊ तुमचा स्वागत करताना आनंद होतेय. आमच्या घरात जरा गर्दी होती, त्यामुळे तुम्हाला येता आलं नाही, आज तुम्ही येताय याचा आम्हाला आनंद आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : अकोल्यात दोन गटात राडा

Virar Accident : विरारमध्ये भीषण अपघात; भरधाव टेम्पोने चिरडल्याने २ वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू

VIDEO : आचारसंहितेबद्दल अजित पवारांचं मोठं वक्तव्य

Team India News: टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी काय करावं लागेल? पाहा समीकरण

Chandrapur News : धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षणाला विरोध; चंद्रपुरात आदिवासीचा महाआक्रोश मोर्चा

SCROLL FOR NEXT