Water Level of Jayakwadi Dam Saam TV
महाराष्ट्र

Jayakwadi Dam Water Level : जायकवाडी धरणात सध्या किती टक्के पाणीसाठा? मराठवाड्याची चिंता वाढवणारी आकडेवारी समोर

Water Level of Jayakwadi Dam : मराठवाड्याला आणखीच तीव्र पाणीटंचाईच्या झळा बसण्याची शक्यता आहे. कारण जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे.

Satish Daud

मराठवाड्याला पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसत असून अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. छत्रपती संभाजीनगरसह प्रमुख शहरांची तहान भागविणाऱ्या जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट झाली आहे. येत्या १० दिवसांत जायकवाडी धरणाचा पाणीसाठा मृत साठ्यावर येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

त्यामुळे मराठवाड्याला आणखीच पाणीटंचाईच्या झळा बसण्याची दाट शक्यता आहे. जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर शहर, जालना, बीड, धाराशिव, परभणी शहराला पाणीपुरवठा केला जातो. तसेच वाळूज शहरातील अनेक उद्योगांना या धरणातून पाणी दिले जाते.

मागील वर्षी २०२३ मध्ये याच दिवशी जायकवाडी धरणात ४०.४६ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला होता. यंदा २५ मार्च २०२४ रोजी २३ टक्के इतका पाणीसाठा होता. मात्र, गेल्या दोन महिन्यात धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटला आहे.

सध्या धरणात केवळ साडेपाच टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणजेच दोन महिन्यात धरणातील पाणीसाठा तब्बल १८ टक्क्यांनी घटला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जायकवाडीच्या पाणीसाठ्यात तब्बल ३४ टक्क्यांची जलतूट आहे.

पिण्याच्या पाणी उपश्यासोबत १.०४० दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे येत्या १० दिवसांत त्यात घट होऊन धरण मृत साठ्यावर येण्याची दाट शक्यता आहे. परिणामी संभाजीनगर, जालना या दोन मोठ्या शहरासोबतच संभाजीनगर जालना नगर जिल्ह्यातील जवळपास साडेचारशे अधिक गावांना आणखीच पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

धरणातील मृतसाठ्याची क्षमता २६ टीएमसी आहे. तो वर्षभर पुरू शकणार आहे. मात्र या साठ्यात १८ टक्के गाळच आहे. तरीही या साठ्यातून मराठवाड्याला पिण्यासाठी व उद्योगाला पाणी मिळेल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. यात बाष्पीभवनाचे प्रमाण या आठ दिवसांत वाढले आहे. सध्या १.०४० दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Telecom Department: आता मोबाईलवर दिसणार कॉलरचं नाव; निनावी कॉल करणाऱ्यांना बसणार चाप

Thane Crime: भिंवडीत संतापजनक प्रकार; 65 वर्षाच्या महिलेवर बलात्कार करत हत्या; शेतात सापडला मृतदेह

MNS : मनसेकडून मतदारयादी घोळाचा पर्दाफाश; राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांनी शोधून काढली मोठी चूक

Thursday Horoscope : महालक्ष्मी प्रसन्न होणार, ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Bachchu Kadu Farmer Protest: 'क्या समजते हो आप! भरगर्दीत बच्चू कडूंनी कलेक्टरला झापलं,पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT