Jay Pawar is expected to hold a press conference and reveal key details regarding the Ajit Pawar plane crash controversy Saam Tv
महाराष्ट्र

रोहित पवारांपाठोपाठ जय पवार मैदानात, दादांच्या मृत्यूला कारणीभूत कोण?

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणी रोहित पवारांकडून घातपाताची संशय व्यक्त केला जातोय... अशातच आता अजित पवारांच्या अपघातप्रकरणी जय पवार मैदानात उतरलेत. जय पवारांनी पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट करण्याचे संकेत दिलेत...या पत्रकार परिषदेत ते नेमका कोणता गौप्यस्फोट करणार?

Bharat Mohalkar

अजित पवारांच्या विमान अपघातानंतर रोहित पवारांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन देत दादांच्या घातपाताचा संशय व्यक्त करत गौप्यस्फोटांची मालिकाच सुरु केली.. मात्र आता रोहित पवारांपाठोपाठ अजित पवारांचा मुलगा जय पवारही अॅक्टिव्ह झाले आहेत... अजित दादांच्या मृत्यूप्रकरणी जय पवार सोमवारी पत्रकार परिषद घेत व्हीएसआर कंपनीविरोधात मोठे गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती समोर आलीय..

अजित 28 जानेवारीला अजित पवारांचं विमान अपघातात निधन झालं... या प्रकरणी आधी अमोल मिटकरी आणि त्यानंतर रोहित पवारांनी पुरावे सादर केले.. तर जय पवारांनीही व्हीएसआर कंपनीवर कारवाईची मागणी केली.. हे सगळं सुरु असतानाच व्हीएसआर कंपनीबाबत संशयाचं धुकं गडद झालं ते डीजीसीएने अपघाताला व्हीएसआर कंपनीच्या विमानाच्या सुरक्षा नियमातील त्रुटी जबाबदार असल्याचा अहवाल दिल्यानं.. डीजीसीएच्या अहवालानंतरही पोलिसांनी व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करुन घेण्यास नकार दिला..

याविरोधात रोहित पवारांनी राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबरोबरच राज ठाकरेंसह उद्धव ठाकरे आणि देशातील महत्वाच्या नेत्यांच्या गाठीभेटींचा धडाकाच लावला... त्यामुळे व्हीएसआर कंपनी संशयाच्या भोवऱ्यात अडकत गेली.. आणि याच दरम्यान जय पवारांनी व्हीएसआर कंपनीचा मालक रोहित सिंग विमान हवेत असताना पायलट सीटवर झोपल्याचा व्हिडीओ ट्वीट केला... एवढंच नाही तर जय पवारांनी ट्वीट करुन आपल्या वडिलांच्या मृत्यूचं दुःख कायम राहील.. मात्र हा हलगर्जीपणा माफ करता येणार नसल्याचं म्हटलं होतं..

मात्र सुनेत्रा पवारांनी संपूर्ण अहवाल आल्यानंतरच प्रतिक्रिया देणार असल्याचं म्हटलंय... हा व्हिडीओ जारी केल्यानंतर जय पवार आता सोमवारी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन मोठे गौप्यस्फोट करणार आहेत.. मात्र पहिल्यांदाच अजित पवारांच्या कुटुंबातूनच पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट करण्याचे संकेत दिल्यानं जय पवारांच्या पत्रकार परिषदेकडे राज्याचं लक्ष लागलंय....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोल्हापुरात मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती?

IDBI Recruitment: आयडीबीआय बँकेत नोकरीची संधी; १३०० पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात १९६०० रुपयांची घसरण; वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

Bigg Boss Marathi 6 : रुचिता गेल्यावर विशालचा नवा गेम प्लान; थेट संपूर्ण घराशी घेतला पंगा, अखेर राखीने वैतागून केली 'ही' गोष्ट

Raj Thackeray : तुमची जात, तुमचा धर्म यापेक्षा... राज ठाकरेंची खास पोस्ट, तरूणांना आवाहन करत म्हणाले...

SCROLL FOR NEXT