jat city bandh today  Saam Digital
महाराष्ट्र

Jat Bandh : जत शहरात कडकडीत बंद, सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते उतरले रस्त्यावर; जाणून घ्या कारण

Jat citizens opposed to pay recent property tax : जत नगरपरिषदने मालमत्ता कर वाढ त्वरित थांबवावी अशी मागणी यावेळी आंदाेलकांनी जत शहरातील चाैका चाैकात केली.

विजय पाटील

जत नगरपालिकेने वाढविलेला मालमत्ता कर रद्द करावा या मागणीसाठी आज (शुक्रवार) जत शहरातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी शहर बंद ठेवण्याचे आवाहन केले हाेते. या आवाहनास शहरवासियांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला. परिणामी जत शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट आहे.

सांगलीच्या जत नगरपरिषदने मालमत्ता करात सुमारे दहा टक्के वाढ केल्याने जत येथील नागरिक संतप्त झाले आहेत. या निर्णयाविराेधात आज सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले.

जतवासियांनी आज सकाळपासून शहर बंद ठेवले आहे. यामुळे जत शहरातील उलाढाल ठप्प झाली आहे. पालिकेने लाेकभावना लक्षात घेऊन निर्णय घ्यावा अन्यथा जनआंदाेलन तीव्र छेडले जाईल असा इशारा आंदाेलकांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Fort : १५ ऑगस्टला फिरण्याचा प्लान करताय? देशभक्तीची भावना जागवणाऱ्या 'या' ऐतिहासिक स्थळांना नक्की भेट द्या

Maharashtra News Live Update : आंबोली-चौकुळच्या सड्यावर कोल्ह्यांच्या कळपाचा मुक्त खेळ

Fitness Tips: जिमला जाण्याची गरज नाही! फिट आणि अॅक्टिव्ह राहण्यासाठी ‘या’ ७ सवयी लावा

Mumbai Police: ड्रग्ज खरेदी करताना पोलिसाला अटक, मुंबई पोलिस दलात खळबळ

Independence Day Marathi Speech : १५ ऑगस्टला भाषण देताय? हे 10 मुद्दे लक्षात ठेवा; भाषण ऐकून सर्वच करतील कौतुक!

SCROLL FOR NEXT