Jalna News Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Effect : जालना पोलिस पाटील भरतीत ‘जरांगे इफेक्ट’! मराठा समाजाच्या उमेदवारांचा डंका

Maratha Reservation : मराठा आरक्षण लढ्यानंतर जालना पोलिस पाटील भरती परीक्षेत ‘जरांगे इफेक्ट’ दिसून आला आहे. अंतरवाली सराटीसह अनेक गावांमध्ये कुणबी प्रमाणपत्राद्वारे मराठा समाजातील उमेदवारांनी ओबीसी आरक्षणातून पोलिस पाटील पदे मिळवली आहेत.

Alisha Khedekar

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने मागण्यांसाठी काढलेल्या यशस्वी मोर्चा नंतर समाजाच्या मागण्या सरकराने मान्य केल्या. यानंतर मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या जालन्यात पोलीस पाटील भरती परीक्षामध्ये जरांगे इफेक्ट दिसून आला आहे. अंतरवाली सराटीसह अनेक गावांमध्ये कुणबी प्रमाणपत्राद्वारे ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाच्या उमेदवाराची पोलीस पाटील म्हणून निवड करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील ७२२ रिक्त पोलीस पाटील पदासाठी भरती परीक्षा पार पडली. जालना जिल्ह्यातील मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या अंतरवाली सराटीमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी राखीव जागा ठेवण्यात आली होती. या जागेवर कुणबी प्रमाणपत्राद्वारे मराठा समाजातील तरुणीने पोलीस पाटीलकी मिळवली आहे. तसेच जालना जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये कुणबी प्रमाणपत्रद्वारे मराठा समाजातील उमेदवारांनी पोलीस पाटीलकी मिळवल्याच समोर आल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT