Shegaon News
Shegaon News Saam Tv
महाराष्ट्र

गण गण गणात बोतेच्या गजराने भक्तीमय झाली जानेफळ नगरी

संजय जाधव

बुलढाणा - पंढरपूर (Pandharpur) येथून आषाढीची वारी पूर्ण करून परतीच्या मार्गावर असलेल्या संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे जानेफळ नगरी येथे मोठ्या दिमाखात स्वागत करण्यात आले. संत श्री शेगावीचा (Shegaon) राणा गजानन महाराजांची पालखी जानेफळ येथे हरिनामाच्या व टाळ मृदंगाच्या गजरात भक्तीमय वातावरणात दाखल झाली होती.

श्रींच्या पालखीचे दर्शनासाठी परीसरातील भाविक भक्तांनी एकच गर्दी केली होती. चौका चौकात फटाक्याची आतिषबाजी रांगोळी काढून चहा, लाडू, बिस्किटे, नास्ता पाणी वारकऱ्यांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

हे देखील पाहा -

संपूर्ण चौकात चौकात जानेफळ श्रींच्या पालखी साठी दारामध्ये आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. श्रींची पालखीची मुक्कामाची व्यवस्था ही सरस्वती महाविद्यालयात करण्यात आली.जानेफळ ग्रामपंचायत सरपंच विश्वनाथ हिवराळे, उपसरपंच गणेश पाखरे, ग्रा.प. सदस्य, गावकरी यांनी श्रीची महाआरती करून पूजन केले.

जानेफळ ग्रामपंचायत सदस्य, भाविक भक्त यांच्या सुयोग्य नियोजनात जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती, ब्रम्हांडनायक ग्रुपने वारकऱ्यांना भोजन स्थळी बिसलेरी बॉटलचे वाटप केले, ब्रह्मांड सेवा अकॅडमी वारकऱ्यांच्या पायाची मालिश करून अमुल्य सेवा देण्यात आली. मुक्कम करून आज शेगाव कडे पालखीचे परस्थान होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Agricultural Commodities Export : भारताची कृषीनिर्यात ९ टक्क्यांनी घसरली, कृषीतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केली उच्चप्रतिच्या निर्यातीची गरज

Astro Tips: आपण देवी-देवतांच्या मंदिराला प्रदक्षिणा का मारतो? काय आहे कारण?

Ratnagiri Tourist: उन्हाळ्याची सुट्टी घालवा रत्नागिरीत; 'ही' ७ ठिकाणे आहेत खास

Maval Lok Sabha: मावळचा गड राखण्यासाठी महायुतीचा प्लॅन काय? जाणून घ्या

RCB Vs GT : आरसीबीचा घरच्या मैदानावर मोठा विजय; गुजरातला नमवत ७ व्या क्रमांकावर झेप

SCROLL FOR NEXT