Woman Killed herself Over Dowry Harassment Saam TV News
महाराष्ट्र

'बिझनेससाठी बापाकडून पैसे आण' मानसिक त्रासाला कंटाळली, विवाहित महिलेने उचललं टोकाचं पाऊल | Jalna

Newlywed woman dies under pressure from in-laws: सृष्टी मणियार या विवाहितेने सासरच्या पैशांच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्या केली. सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल; परिसरात संतापाची लाट.

Bhagyashree Kamble

अक्षय शिंदे, साम टिव्ही

पुण्यातील अश्विनी हगवणे प्रकरणानंतर महिलांवरील छळाच्या घटनांना आळा बसण्याचे नावच घेत नाहीये. अशातच जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहित महिलेनं आत्महत्या केली आहे. नवीन व्यावसायासाठी महिलेकडून माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा लावण्यात येत होता. याच मानसिक त्रासाला कंटाळून तिनं राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवलं. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सृष्टी मणियार असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे. ती मंठा शहरातील मारवाडी भागात आपल्या सासरच्या मंडळींसोबत राहत होती. २०२४ साली तिचा विवाह संकेत मणियार याच्याशी झाला होता. मात्र, लग्नानंतर काही महिन्यांतच तिच्यावर माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा लावला जात होता. सासरच्यांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी पैशांची गरज होती, त्यामुळे सृष्टीवर सातत्याने पैशांसाठी दबाव टाकण्यात येत होता.

सासरच्या मंडळींकडून वारंवार मानसिक छळ केला जात होता. याच त्रासाला कंटाळून तिने राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं. या घटनेची माहिती सृष्टीच्या आई वडिलांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घाव घेतली. तसेच पोलिसांनाही माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवलं.

सृष्टीच्या आईने सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून पती संकेत मणियार, सासरा कैलास मणियार आणि सासू ,नणंद यांच्या विरोधात मंठा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारामतीत देशभक्ती उजळून निघणार, ३० मीटर उंच राष्ट्रध्वजाचे भव्य लोकार्पण|VIDEO

Peanut Chocolate Recipe : फक्त ३ साहित्य वापरून बनवा कुरकुरीत आणि गोडसर शेंगदाणा चॉकलेट

Maharashtra Tourism: छत्रपती संभाजीनगरमध्ये वसलाय स्वर्ग,'ही' सुंदर ठिकाणं पाहिलीत का?

Maharashtra Live News Update: पुण्यातील शिवसृष्टी 31 ऑक्टोबर पर्यंत सवलतीच्या दारात पाहता येणार

Elephant Tramples Tourist: बापरे! पर्यटकाच्या वागण्यावर भडकले गजराज; पाठलाग करत पायाखाली तुडवलं| Video Viral

SCROLL FOR NEXT