Jalna rain  Saam tv
महाराष्ट्र

Unseasonal Rain in Jalna : जालना जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा; शेतात काम करताना वीज कोसळून दोघांचा मृत्यू

Jalna Unseasonal Rain marathi News : अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. या अवकाळी पावसादरम्यान भोकरदन तालुक्यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

लक्ष्मण सोळुंके

Jalna Unseasonal Rain :

जालना जिल्ह्याला अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. या अवकाळी पावसादरम्यान भोकरदन तालुक्यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (Latest Marathi News)

आज सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसात अंगावर वीज कोसळून एका वीस वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. भोकरदन तालुक्यातील कुंभारी गावात ही घटना घडली. तर दुसरीकडे ३८ वर्षीय शेतकऱ्याचाही अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला आहे. भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार गावातील हा रहिवाशी होता.

शेतात काम करताना वीज कोसळली

अर्चना विशाल दाभाडे या महिलेचा अंगावर वीज कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अर्चना ही आपल्या शेतात शेती काम करत होती. त्याचवेळी सायंकाळी पाच वाजल्याच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडटात गारपीट सुरु झाली. यामुळे ही महिला शेतात अडकली, या गाराच्या पाऊसापासून बचाव करण्यासाठी ही महिला चालत जात असताना या महिलेच्या अंगावर वीज कोसळली.

या घटनेने महिला जखमी झाली असल्याची माहिती मिळताच गावाकऱ्यांनी शेताच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर या महिलेला तात्काळ उपचारासाठी भोकरदन शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तपासून या महिलेचा रुग्णालयात दाखल करण्याआधी मृत्यू झाल्याची घोषणा केली. अर्चना दाभाडे यांना सासू -सासरे, पती आणि एक दीड वर्षाचा मुलगा असा त्यांचा परिवार आहे. या घटनेत त्यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याने त्यांचा दीड वर्षाचा चिमुकला पोरका झाल्याने परिसरत हळहळ व्यक्त केली जात आहे.

अंगावर वीज कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार गावातील शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत शिवाजी गणपत कड असं 38 वर्षीय शेतकऱ्याच नाव आहे. ३८ वर्षीय शिवाजी कड हे सायंकाळी 7 वाजल्याच्या सुमारास शेतात असताना अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट सुरु असताना अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच गावाकऱ्यांनी शेतात धाव घेतली. या घटनेत शिवाजी कड यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावरून शोकळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रात भरारी पथकाकडून ६६० कोटी १८ लाख रुपयांची जप्त

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

SCROLL FOR NEXT