Jalna : टेंभुर्णीचे तीन विद्यार्थी युक्रेनहून परतले; पालकात आनंदाचे वातावरण SaamTv News
महाराष्ट्र

Jalna : टेंभुर्णीचे तीन विद्यार्थी युक्रेनहून परतले; पालकात आनंदाचे वातावरण

आपली मुले सुखरूप घरी परतल्याने पालकांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू अनावर झाले होते.

लक्ष्मण सोळुंके

जालना : जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी गावातली पाच विद्यार्थी युक्रेनला वैद्यकीय शिक्षणासाठी गेले होते. युक्रेन आणि रशियात (Russia Unkraine War) सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर हे विद्यार्थी त्या ठिकाणी अडकल्याने पालकांच्या चिंतेत भर पडली होती. दोन दिवसांपूर्वी नागेश साळवे नावाचा विद्यार्थी युक्रेनहून परतला होता. त्यातच काल युक्रेनमध्ये (Ukraine) अडकलेले तीन विद्यार्थी सुयोग धनवाई, संकेत उखार्डे, व तेजस पंडित यांनी त्यांच्या उझिरोड विद्यापीठातून हंगेरीकडे प्रवास सुरु केला होता.

हे देखील पहा :

भारत सरकारने पाठवलेल्या भारतीय वायू सेनाच्या (Indian Airforce) विमानाने ते आज दिल्ली या ठिकाणी पोहचले आणि दिल्ली येथून आज हे तीनही विद्यार्थी संध्याकाळी औरंगाबाद विमान तळावर पोहचले. त्यांना घेण्यासाठी औरंगाबाद (Aurangabad) विमानतळावर त्यांचे पालकही पोहचले. आपली मुले सुखरूप घरी परतल्याने पालकांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू अनावर झाले होते.

पालकांनी आणि नातेवाईकांनी त्यांचं स्वागत केले. टेंभुर्णी गावातील पाच पैकी चार विद्यार्थी सुखरूप परतले आहेत. तर, शुभम पंडित हा विद्यार्थी अजूनही युक्रेन मध्ये अडकला असल्याने त्याला लवकरात लवकर भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनच्या वतीने देण्यात आली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 518 घरांची पडझड

Saturday Horoscope : कामात नवीन जबाबदाऱ्या मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना डोकं शांत ठेवण्याची गरज

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

SCROLL FOR NEXT