Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalna School: ९वीच्या वर्गात का बसला? मुख्याध्यापकांचा राग अनावर; डोकं थेट भिंतीवर आदळलं

Jalna Crime News: नववीच्या वर्गात का बसला म्हणून शाळेतील मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केली आहे. या प्रकरणी विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Bhagyashree Kamble

नववीच्या वर्गात का बसला म्हणून, शाळेतील मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केली आहे. या प्रकरणी विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना जालन्यातील शहागड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत घडली असून, या प्रकरणानंतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

जालन्यातील शहागड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत एक धक्कादायक घटना घडली आहे. शाळेतील मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याला शुल्लक कारणावरून बेदम मारहाण केली असून, विद्यार्थ्याचे केस ओढत भिंतीला डोके आपटले आहेत. या धक्कादायक प्रकरणानंतर विद्यार्थ्याने पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

विद्यार्थ्याने पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, विद्यार्थी नववीच्या वर्गात बसला होता. इयत्ता नववीच्या वर्गात का बसलास? म्हणत विद्यार्थ्याला हातावर आणि मांडीवर अमानुषपणे मारहाण केली. मुख्याध्यापकाने वर्गातच विद्यार्थ्याला मारहाण केल्याची माहिती आहे. नंतर मुख्याध्यापकाने केस ओढत विद्यार्थ्याचे डोके भिंतीला आदळले. नंतर मांडी आणि गाळावर देखील बेदम मारहाण केली आहे.

मुख्याध्यापकाने केलेल्या मारहाणीत विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून, त्यानं तातडीनं घर गाठत यासंदर्भातली माहिती कुटुंबाला दिली. त्यानंतर कुटुंब आणि विद्यार्थ्याने जालन्यातील गोंदी पोलिस ठाणे गाठत मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मुख्याध्यापक आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bathroom Selfie Trend: बाथरूम सेल्फी ट्रेंड नेमका काय आहे? मुली का करतात फॉलो

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार? शिवसेना खासदारांची मोर्चेबांधणी सुरु

Egg Side Effects: उन्हाळ्यात जास्त अंडी खाणं टाळा, अन्यथा...

Saree Draping Tips : साडी अशी नेसा की सुटायचं टेन्शनच नाही, 'या' ५ स्टेप्स करा फॉलो

Ashok Kharat: भोंदूबाबा अशोक खरातची आणखी ३ काळी कृत्य समोर, पीडित महिलांनी SIT समोर सगळं काही सांगितलं

SCROLL FOR NEXT