Samruddhi Mahamarg Accident Saam Tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रकने मजुरांना चिरडलं; ६ महिलांचा जागीच मृत्यू

Jalna Accident: जालन्यामध्ये समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या महिला मजुरांना ट्रकने चिरडले. या अपघातामध्ये ६ महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला.

Priya More

Summary:

  • समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

  • भरधाव ट्रकने मजूर महिलांना चिरडलं

  • ६ महिलांचा जागीच मृत्यू

  • अपघाताचा तपास जालना पोलिस करत आहेत

जालन्यामध्ये समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने महामार्गावर काम करणाऱ्या महिला मजुरांना चिरडले. या अपघातामध्ये ६ महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला. महिलांच्या मृतदेहांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. या घटनेची माहिती मिळताच जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यातील कडवंची शिवारात ही अपघाताची घटना घडली. नागपूरवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या महिला मजुरांना चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की ट्रकच्या चाकाखाली चिरडून ६ महिला मजूरांचा जागीच मृत्यू झाला. महामार्गावर सगळीकडे रक्ताचा सडा पडला आहे. या अपघाताची माहिती मिळताच जालना तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या महिलांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास पोलिस करत आहे. अपघातामध्ये मृत्यू झालेल्या महिलांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिस या ट्रकचालकाचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT