Witchcraft In Gondi ZP School Saam Tv
महाराष्ट्र

Jalna News: शाळेच्या वर्गात बांगड्या, हळदी-कुंकू, बाहुली; विद्येच्या मंदिरात अंधश्रद्धेचा खेळ

Witchcraft In Gondi ZP School: अंधश्रद्धा समूळ नष्ट होण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायदा आहे. मात्र तरीही जादूटोण्याचे प्रकार अनेक ठिकाणी होत आहेत. मात्र जालन्यातील प्रकारानं सगळ्यांचीच झोप उडाली आहे. पाहूया नेमकं काय घडलं या खास रिपोर्टमधून

Girish Nikam

महाराष्ट्रातल्या सगळ्याच संतांनी अंधश्रद्धेवर प्रहार केला आहे. राज्यात अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायदा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि काही सजग संस्थाही अंधश्रद्धेविरोधात बोट ठेवत जनजागृती करत असतात. मात्र तरीही अनेक ठिकाणी अगदी शहरापासून ते खेड्यापर्यंत करणी, जादूटोणा असे प्रकार आढळून येत आहेत. जालना जिल्ह्यातील गोंदीमध्ये तर चक्क शाळेमध्ये जादूटोण्याचा प्रकार घडल्यानं खळबळ उडाली आहे.

जिल्हा परिषद शाळेच्या नववीच्या वर्गात कापलेलं लिंब, बांगड्या, हळदी-कुंकू, पाऊलाचे, हाताचे ठसे आणि बाहुली आढळली आहे. हा धक्कादायक प्रकार पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांनी पळ काढला. मुख्याध्यापकांनी पोलिस ठाण्यात पत्र देऊन झाल्या प्रकाराबाबत माहिती दिली आहे. शाळेतल्या या घटनेनं संपूर्ण गाव हादरुन गेलंय. साम टीव्हीनं काही सवाल उपस्थित केले आहेत.

साम टीव्हीचे सवाल

वर्ग बंद असताना हा प्रकार कोणी केला ?

गावातल्या कोणाच्या विरोधात हा प्रकार आहे का?

शाळेच्या वर्गातच जादूटोणा करण्याचा उद्देश काय आहे?

शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची चोरी आणि जादू टोण्याचा संबंध आहे का?

संताप आणणारी बाब म्हणजे अंधश्रद्धेचा एवढा गंभीर प्रकार होऊनही पोलिस प्रशासन उदासिन आहे. चौकशी करु, असं कोरडं उत्तर अधिकारी देतायेत. तर अंनिस गावात जाऊन पाहणी करणार आहेत.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही कोल्हापूरातल्या कागलमध्येही उमेदवारावर जादूटोण्याचा प्रकार समोर आला होता. जालन्यातील शाळेमधला प्रकार हा तर कळस आहे. विद्यार्थ्यांना संस्काराचे, ज्ञानाचे ध़डे देणाऱ्या वर्गातच जादूटोण्याचा प्रकार करणे म्हणजे एक प्रकारची विकृती आहे. एखाद्याची एव्हढी हिंमत होणं हे सुद्धा सामाजिक अपयश आहे. प्रबोधन करुन आणि कडक कारवाईनेच अशा अंधश्रद्धेची मानसिक गुलामी नष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT