Bhokardan Rain  Saam tv
महाराष्ट्र

Bhokardan Heavy Rain : भर उन्हाळ्यात ओढ्याना पूर; भोकरदन तालुक्यात अवकाळी पावसाने झोडपले

Jalna News : पावसाचा जोर इतका होता की छोटे- मोठे ओढे मोठ्या प्रमाणात खळखळून वाहायला लागल्याने रस्त्याच्या वरून पाणी वाहत असल्याचेही दिसून आलं

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 

जालना : राज्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरु असल्याचे आज देखील पाहण्यास मिळाले. यात जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. यामुळे परिसरातील छोट्या मोठ्या ओढ्याना भर उन्हाळ्यात पूर आल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. तर जोरदार पावसामुळे पाण्याची चिंता काहीशी मिटणार असली तरी दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होत आहे. 

जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी, कुंभारी, गारखेडा, लिंगेवाडी, बेलोरा आणि वलसा यासह इतर आसपासच्या गावात अवकाळी पावसाने जोरदार बॅटिंग केली. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. तर पावसाचा जोर इतका होता की छोटे- मोठे ओढे मोठ्या प्रमाणात खळखळून वाहायला लागल्याने रस्त्याच्या वरून पाणी वाहत असल्याचेही दिसून आलं. 

फळबाग उत्पादक शेतकरी चिंतेत 

जालना जिल्ह्यात मागील पाच ते सहा दिवसापासून ढगाळ वातावरण असून हवामान विभागाकडून विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार आज दुपारी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तर पुढील चार दिवस पावसाचे असल्याने फळबाग उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

इंदोर- पुणे महामार्गावरील वाहतूक खोळंबली 

मनमाड शहर व परिसरात विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे इंदोर- पुणे महामार्गावरील मनमाड बसस्थानकाच्या परिसरात विद्युत तारा व एक झाड पडल्याने या महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. झाड पडल्याने वाहतूक दुसऱ्या बाजूने सुरू झाली असून विद्युत पुरवठा मात्र गेल्या एक तासापासून खंडित झाला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT