Pimpri Chinchwad Crime : अल्पवयीन तरुणीची भररस्त्यात हत्या; पोलीस तपासात धक्कादायक माहिती आली समोर, परप्रांतीय मामा भाचा ताब्यात

Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकर वाडी येथे ११ मे रोजी रात्री एका अल्पवयीन तरुणी कोमल भरत जाधव हिची धारदार चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आली होती
Pimpri Chinchwad News
Pimpri Chinchwad NewsSaam tv
Published On

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये भर रस्त्यावर मध्यरात्री तरूणीवर धारधार शस्त्राने सपासप वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. दरम्यान तरुणीचा खून केल्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासातच तरुणीच्या मारेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकर वाडी येथे ११ मे रोजी रात्री एका अल्पवयीन तरुणी कोमल भरत जाधव हिची धारदार चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आली होती. दुचाकी वाहनावर हेल्मेट घालून आलेल्या दोन जणांनी मिळून कोमल जाधव हिच्यावर भररस्त्यात शस्त्राने वार केला आहे. यानंतर दुचाकीवरील दोघेजण दुचाकीवरून कृष्णाईनगर परिसरात फिरताना सीसीटीव्हीत समोर आले होते. यानंतर पोलिसांकडून अज्ञात मारेकाराचा शोध घेण्यास सुरवात करण्यात आली.

Pimpri Chinchwad News
Bhusawal Surat Passenger : एक महिन्याच्या बाळाला घेऊन दाम्पत्य रेल्वेत चढले; बोगीत झोळी करून झोपविले, पुढच्या स्टेशनवर उतरून आई- वडिल पसार

परप्रांतीय मामा- भाच्याने मिळून केली हत्या 

परप्रांतीय असलेले उदयभान यादव आणि त्याचा भाचा अभिषेक यादव यांनी मिळून कोमल जाधव (वय १७) हिच्यावर चाकूने वार करून खून केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासात या प्रकरणात आता चिंचवड पोलिसांनी उदयभान यादव आणि अभिषेक यादव या दोन्ही आरोपींना अगदी काही तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. 

Pimpri Chinchwad News
Maharashtra Unseasonal Rain : राज्यात अवकाळीचा कहर सुरूच; पुण्यासह नंदुरबार, नाशिकमध्ये जोरदार पाऊस

आर्थिक संबंधातून हत्या 

दरम्यान खुनातील संशयित आरोपी उदयभान हा मृत कोमल जाधव हिच्या घरासमोरच राहिला होता. तसेच उदयभान आणि कोमल यांच्यात काही आर्थिक संबंध देखील झाले होते. याच वादातून उदयभान यादव याने आपला भाचा अभिषेक यादव याच्या मदतीने रविवारी रात्री कोमल रस्त्याने जात असताना तिच्यावर चाकूने वार करून खून केल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com