Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: शिक्षकाची बदली रद्दसाठी विद्यार्थ्यांचा गावात मोर्चा

शिक्षकाची बदली रद्दसाठी विद्यार्थ्यांचा गावात मोर्चा

लक्ष्मण सोळुंके

जालना : अंबड तालुक्यातील भांबेरी गावातील (Jalna News) जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षकाची बदली झाली आहे. हे कळताच शाळेतील विद्यार्थ्यांनी (Student) चक्क हातात फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी करत बदली रद्दसाठी गावातच प्रभात फेरी काढत मोर्च्या काढला. (Tajya Batmya)

भांबेरी येथील जि.प. शाळेतील मच्छिंद्र घोडसे असे या बदली झालेल्या शिक्षकांचे (Teacher) नाव असून शिक्षकांच्या बदलीचे आदेश अजून प्राप्त झालेले नाही. तरी देखील सरांची बदली झाल्याच्या चर्चेने विद्यार्थी भावुक झाले. त्यांनी गावात मोर्च्या काढत सरांच्या बदली रद्द केल्याची मागणी केली.

घोषणांनी परिसर दणाणला

३६९ विध्यार्थी संख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळेत पट संख्येनुसार १३ शिक्षकांची आवश्यकता आहे. मात्र ६ शिक्षक कार्यरत असल्याने त्यांतच आवडत्या शिक्षकांची बदली झाल्याने विद्यार्थी निराश झाले. यामुळे विद्यार्थ्यांनी या प्रभात फेरी स्वरूपात काढलेल्या मोर्च्याच्या माध्यमातून रद्द करा रद्द करा, घोडसे सरांची बदली रद्द करा; अश्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. त्यामुळे आता शिक्षण विभाग काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस, प्रकृती खालावली

Bank Closed : आजपासून पुढील ४ दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या काय आहे कारण

साताऱ्यात खळबळजनक प्रकार! भाजपच्या नेत्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, धक्कादायक कारण समोर

Cancer warning signs: शरीरातील छोट्या बदलांकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात; कॅन्सरचे संकेत ओळखण्यासाठी करा या ५ तपासण्या

Weather Update : आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार; विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT