St Bus Jalna News
St Bus Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा धावली विद्यार्थ्यांसाठी बस; शालेय मुलींच्या चेहऱ्यावर आनंद

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील आंबा गावात पहिल्यांदाच मानव विकासच्या माध्यमातून (Jalna News) शाळेतील मुलींसाठी बस (St Bus) धावली. स्‍वातंत्रानंतर प्रथमच बस आल्याने मुलींच्या चेहऱ्यावर आनंद बघायला मिळाला. (Maharashtra News)

परतूर शहरापासून जाणाऱ्या मुख्य महामार्गापासून अवघ्या सात किलो मीटर अंतरावर असलेल्या आंबा गावातून मोठ्या संख्‍येने विद्यार्थी शिक्षणासाठी (Education) येत असतात. मात्र गावातून कुठल्या प्रकारची वाहतूक सुविधा उपलब्ध होत नसल्याने मुलांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागत होती. त्यामुळे अनेक विद्यार्थी (Student) शिक्षणापासून वंचित राहत होते. याबाबत शिक्षकाकडून महामंडळ विभागाला (MSRTC Bus) विद्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरू करावी; अशी केल्या जात होती.

तीन शाळेतील विद्यार्थ्यांना फायदा

आगार प्रमुख दिगंबर जाधव यांनी याबाबत एका दिवसात निर्णय घेऊन मानव विकास मिशन अंतर्गत शाळेतील विद्यार्थिसाठी बससेवा सुरू केली. यामुळ विद्यार्थीनींच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पहायला मिळाला. या बस सेवेमुळे परतूर शहरातील तीन शाळेतली विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. शहराजवळ अवघ्या सात किलो मीटर अंतरावर असलेल्या या आंबा गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बस जाणार असल्याने विद्यार्थी मोठ्या आनंदात होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhananjay Munde Speech Beed | धनंजय भाऊंनी सभा गाजवली!

Tanaji Sawant | तानाजी सावंत यांचा मोठा गौप्यस्फोट

Effects of Eating Stale Rice: शिळा भात आरोग्यासाठी फायदेशीर की हानिकारक?

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस उज्ज्वल निकम यांच्याबद्दल काय म्हणाले ?

Today's Marathi News Live : राहुल गांधींच्या सभेत महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनाच नो एन्ट्री

SCROLL FOR NEXT