Cotton Price: कापसाच्या दरात घसरण; शेतकऱ्यांची अडचण

कापसाच्या दरात घसरण; शेतकऱ्यांची अडचण
Cotton Price
Cotton PriceSaam tv

चेतन व्यास

वर्धा : यावर्षी वर्धा जिल्ह्यात सततच्या पावसामुळे कापसाचे उत्पादन घटले आहे. त्यात कापसाचे दरही घसरू लागल्याने शेतकऱ्यांची (Farmer) अडचण वाढली आहे. आधीच उत्पादन घटल्याने खर्चही निघणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. (Breaking Marathi News)

Cotton Price
Nashik News : 3 दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती, गोदा पात्रात आढळला अल्पवयीन मुलीचा मतदेह

मागील वर्षी कापसाचे भाव (Cotton Price) प्रति क्विंटलला दहा हजार रूपयांच्या वर होते. त्यामुळे यंदाही चांगले भाव मिळतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. कापूस (Cotton) खरेदीच्या उद्घाटनाला नऊ हजार रुपयांवर प्रति क्विंटलला भाव देण्यात आला. पण बहुतांश ठिकाणी सध्या नऊ हजार ते नऊ हजार रुपयांच्या खालीच कापसाला भाव आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा हा परिणाम असल्याचे (Wardha News) हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. सुधीर कोठारी यांनी सांगितले.

खर्चात झालीय वाढ

सततच्या पावसाने बहुतांश भागातील कपाशीची परिस्थिती पाहता वर्धा जिल्ह्यात कापसाचे उत्पादन घटले आहे. मात्र खर्चात मोठी वाढ झाली आहे. निंदण, औषधी, खतांसह आवश्यक बाबींवर शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागला आहे. दरवर्षीच्या तुलनेत खर्चात वाढ झाली आहे. आधीच कापसाचे उत्पादन घटले आहे; त्यात भावही घसरत असल्याने शेतीसाठी केलेला खर्च भरून निघेल की नाही हा प्रश्नच आहे.

हमीभाव सहा हजार

कापसाचे हमीभाव सहा हजार तीनशे रुपये आहे. त्यापेक्षा बाजार भाव किंचित जास्त असले तरी वाढलेल्या खर्चामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भावातही नुकसानच सहन करावे लागत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी काय करावे हा प्रश्नच आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com