Jalna News
Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: भोकरदन शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

लक्ष्मण सोळुंके

जालना : गेल्या आठवड्यापासून जालना शहरासह जिल्ह्यात उन्हाचा पारा ४० अंश डीग्रीच्या पार (Jalna News) जात आहे. असे असताना आज अचानक जिल्‍ह्यातील भोकरदन (Bhokardan) शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे नागरीकांची धावपळ उडाली आहे. (Maharashtra News)

जालना शहर व परिसरात मागील पंधरवाड्यापासून तापमान ४० अंशाच्‍यावर आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात उकाडा निर्माण झाला आहे. उष्‍णतेच्‍या झळा देखील असह्य होत होत्‍या. दरम्‍यान हवामान विभागाकडून राज्‍यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्‍यता वर्तविली होती. या अंदाजानुसार भोकरदन परिसरात आज वादळी वारा व पावसाचे आगमन झाले.

उकाड्यापासून थोडा दिलासा

भोकरदन शहरासह परिसरात दुपारी साडेतीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला आहे. अचानक आलेल्या या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे तापमान (Tempreture) खाली गेले असून नागरिकांना उकड्यापासून थोडासा दिलासा मिळाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Ambedkar in Jalgaon : PM मोदी दिल्लीतील उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनाही भेटायला तयार नव्हते; प्रकाश आंबेडकरांची टीका

Abhijeet Bichukale News | अभिजीत बिचुकले यांनी यावेळी कल्याण मतदारसंघ का निवडला?

Dhananjay Munde Speech Beed | धनंजय भाऊंनी सभा गाजवली!

Tanaji Sawant | तानाजी सावंत यांचा मोठा गौप्यस्फोट

Effects of Eating Stale Rice: शिळा भात आरोग्यासाठी फायदेशीर की हानिकारक?

SCROLL FOR NEXT